जाहीरातींमुळे होतेय एसटींचे विद्रुपीकरण

By Admin | Published: January 14, 2015 11:11 PM2015-01-14T23:11:11+5:302015-01-14T23:11:11+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर आता सरकारीसोबत खासगी जाहिरातींचे फलक चिकटविण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही विद्रुपीकरण होत आहे.

STT's insemination happens due to the advertisement | जाहीरातींमुळे होतेय एसटींचे विद्रुपीकरण

जाहीरातींमुळे होतेय एसटींचे विद्रुपीकरण

googlenewsNext

गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर आता सरकारीसोबत खासगी जाहिरातींचे फलक चिकटविण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही विद्रुपीकरण होत आहे.
महामंडळाच्या बस फुकटात जाहिराती लावण्याचे साधन ठरत असून यावर कारवाई होत नसल्याने या जाहिरातदारांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसत आहे.
बरेचदा या जाहिरातदारांकडून बसच्या दर्शनी भागावरही पत्रक लावले जातात. उत्पादनांच्या जाहिरातीचे फलक चिकटवून महामंडळ प्रशासनाने लावलेल्या महत्त्वाच्या सूचनाही यामुळे झाकल्या जातात. राज्य परिवहन महामंडळाकडून बसच्या दर्शनी भागात व्यावसायिक व शासकीय उत्पादनांच्या जाहिराती लावण्यात येतात.
याबाबत एसटी महामंडळासोबत ठराविक कालावधीकरिता व्यावसायिक करार केला जातो. यातून एसटीला उत्पन्नही मिळते. तर हरविलेल्या व्यक्ती संदभार्तील सूचना तसेच सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या माहिती संदर्भार्तील फलक बसच्या बाह्य व अंतर्गत भागावर लावण्यात तितकेसे वावगे ठरणारे नाही. मात्र अनेक उत्पादक आपल्या वस्तूच्या प्रसिद्धीसाठी परवानगीविनाच जाहिराती लावत असल्याने एसटीचे विद्रुपीकरण झाले आहे. त्यांच्यावर महामंडळ प्रशासनाकडून कारवाई होत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: STT's insemination happens due to the advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.