विद्यार्थ्यांनो नेहमी सकारात्मक विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:53 AM2019-01-20T00:53:18+5:302019-01-20T00:55:08+5:30

जीवनात यश मिळविण्यासाठी धैर्य, चिकाटी, जिद्द व सामाजिक बांधीलकी या गोष्टींची आवश्यकता असते. यश-अपयश हा पाठशिवनीचा खेळ आहे. कधी यश मिळते तर अपयश वाट्याला येते. तेव्हा विद्यार्थ्यानो नेहमी सकारात्मक विचार करा, यश आपोआप तुमच्यापर्यंत चालत येईल असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य जगदीश येरोला यांनी केले.

Students always think positively | विद्यार्थ्यांनो नेहमी सकारात्मक विचार करा

विद्यार्थ्यांनो नेहमी सकारात्मक विचार करा

Next
ठळक मुद्देजगदीश येरोला : नॅशनल कला महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : जीवनात यश मिळविण्यासाठी धैर्य, चिकाटी, जिद्द व सामाजिक बांधीलकी या गोष्टींची आवश्यकता असते. यश-अपयश हा पाठशिवनीचा खेळ आहे. कधी यश मिळते तर अपयश वाट्याला येते. तेव्हा विद्यार्थ्यानो नेहमी सकारात्मक विचार करा, यश आपोआप तुमच्यापर्यंत चालत येईल असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य जगदीश येरोला यांनी केले.
येथील नॅशनल कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप समारंभात सोमवारी (दि.१४) ते बोलत होते. उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी के.बी.बंसोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून माधोराव भोयर, चंदन वासनिक, सुरेश चन्ने, रामू भोयर, सरपंच गंगा लिल्हारे, नंदकिशोर भोयर, हुपराज जमईवार, माणिक झंझाळ, पी.एम.पापनकर, डी.आर.पटले, एस. एस. ढोले, पी. एम. मंजुटे, ए.जी.कुकडे, सी. एम. बावणे, दिलीप राऊत, सुभाष अंबुले, एन.बी.पटले, एम.के.बिसेन उपस्थित होते. पुढे बोलताना येरोला यांनी, विद्यार्थ्यानी आपले ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल करावी. जिद्द आणि चिकाटीशिवाय प्रगती घडून येत नाही. शिक्षणासह संस्कार सुद्धा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य पटले यांनी मांडले. संचालन प्रा. संदीप टेंभेकर यांनी केले. आभार प्रा. व्ही. एन. बागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.एम.एम.मुडे, जे.बी.रहमतकर, व्ही. आर. गौतम, बी.बी.पटले, दिपाली मेश्राम यांनी सहकार्य केले.

Web Title: Students always think positively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.