लोकमत ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 09:53 PM2017-12-06T21:53:20+5:302017-12-06T21:53:42+5:30
आजच्या विज्ञान युगात स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व आहे. आज स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करुन मोठमोठ्या पदावर नवीन पिढी जात आहे.
आॅनलाईन लोकमत
तिरोडा : आजच्या विज्ञान युगात स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व आहे. आज स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करुन मोठमोठ्या पदावर नवीन पिढी जात आहे. बालवयातच लोकमत संस्काराचे मोतीमुळे स्पर्धा परीक्षेची जाणीव, विविध माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा प्राप्त झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या जगाची माहिती मिळून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत प्राचार्य सतिश मंत्री यांंनी व्यक्त केले.
शहीद मिश्रा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ‘लोकमत संस्काराचे मोती’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते.
या वेळी प्राचार्य मंत्री, लोकमतचे तालुका प्रतिनिधी डी.आर. गिरीपुंजे यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. या वेळी शाखा समितीचे सदस्य दीपक जायस्वाल, शिक्षिका छाया मडावी, पामराज टेंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या अनुक्रमे हर्षल उदेलाल बोपचे, रिया अनिल बावनकर, डिलेश्वरी ग्यानीराम ब्राम्हणकर यांना रिमोट कंट्रोल कार, लंच बॉक्स तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना (७४) टिफीन बॉक्स देण्यात आले.
या वेळी पर्यवेक्षक ए.जी. नागपुरे यांनी, विद्यार्थ्यांनी लोकमतमधील संस्काराच्या मोती या पानावरील माहितीचे संकलन करावे, या माहितीचा भविष्यात उपयोग होईल. सामान्य ज्ञानात वाढ होवून पुढे स्पर्धा परीक्षांसाठी ते ज्ञान उपयोगी ठरेल, असे सांगितले.
तर तालुका प्रतिनिधी गिरीपुंजे यांनी, आत्मविश्वास कसा निर्माण करावा, त्यासाठी काय करावे व त्यात कसे सातत्य असावे, असे सांगून परीक्षांना सामोरे जाण्यासाठी कशी तयारी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संचालन व आभार लोकेश चौरावार यांनी केले. कार्यक्रमासाठी पुष्पा चवळे, साधना व्यास, पी.एम. हरिणखेडे, संध्या खंडाते, दिलीप झरारीया, आर.जे. ठाकूर, रंजना वाहणे, ओमेश्वरी चौधरी, धर्मराज बिसेन यांनी सहकार्य केले.