तंत्रशिक्षणात विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल

By admin | Published: June 15, 2015 12:49 AM2015-06-15T00:49:28+5:302015-06-15T00:49:28+5:30

नागपूर येथील मिहान प्रकल्पाचे कार्य प्रगतीपथावर आहे.

Students' future bright in technical education | तंत्रशिक्षणात विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल

तंत्रशिक्षणात विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल

Next

आमगाव : नागपूर येथील मिहान प्रकल्पाचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेवून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन माजी आ. केशवराव मानकर यांनी केले.
लक्ष्मणराव मानकर गुरूजी संकुलात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा शुक्रवार (दि.१२) पार पडले. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
उद्घाटन प्रफुल्ल वरखडे यांच्या हस्ते करण्यात आले. तंत्रशिक्षणात विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. मेळाव्यात त्या संबंधीचे स्टॉल्स लावण्यात असून माहिती पत्रकांतून संपूर्ण माहिती आपणास घेता येईल, असे ते म्हणाले. याप्रसंगी कार्यकारी प्राचार्य डॉ. डी.के. संघी, उद्योजक मनीष अग्रवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे शिवणकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य संदीप हनुवते यांनी केले.
मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात गोंदिया शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे अधिव्याख्याता एस.डी. अंबादे यांनी प्रवेश प्रक्रिया व आॅनलाईन फॉर्म भरणे याबाबत मार्गदर्शन केले. एमकेसीएलतर्फे आदित्य कंप्यूटर आमगावचे मनोज लुलु व सूर्यवंशी यांनी एमएससीआयटी, क्लिक डिप्लोमा, विविध लँग्वेज अभ्यासक्रम, टॅली याबाबत मार्गदर्शन केले. संचालन प्रा. के.आर. चौधरी यांनी केले.
मेळाव्याला परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रा. पंकज कटरे, नरेंद्र कावळे, विनायक अंजनकर, प्रा. ए.ए. सड्डल, जे.एम. गेडाम, राहुल संघी, प्रा. विजय राऊत, प्रशांत रावते, डिलेंद्र राणे, अमरिश रामटेके, राकेश दशरिया, रविशंकर राऊत, नीरज शहारे, सुनील शहारे, लक्ष्मी मते, कारूबाकी सामल, दिप्ती ठाकरे, उमेद पटले, एम.आर. तिवारी, देवेंद्र बोरकर, राकेश तिवले, दिनेश मस्के, भुमेश्वर ठाकरे, प्रशांत सोनवाने, नरेश कटरे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Students' future bright in technical education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.