विद्यार्थ्यांना मिळाली सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 09:22 PM2017-11-05T21:22:44+5:302017-11-05T21:22:56+5:30
तिरोडा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत होती. मागील वर्षी छत व भिंती कोसळल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत होती. मागील वर्षी छत व भिंती कोसळल्या. यानंतर ‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात’ या लोकमतच्या बातमीची दखल घेवून तीन वर्गखोली मंजूर करून बांधकाम करण्यात आले. आता या वर्गखोलींचे लोकार्पण करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षा मिळाली आहे.
पडक्या इमारतीत वर्ग पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिकत असल्याने त्यांचा जीव धोक्यात होता. तसेच शिक्षकही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून जीव मुठीत ठेवून अध्यापनाचे कार्य करीत होते. दरम्यान मागील वर्षी शाळेचे छतच कोसळले, भिंतीही पडल्या. तरी दुसºया जीर्ण खोलीत वर्ग सुरू होते.
या प्रकरणाची दखल घेत लोकमत प्रतिनिधीने बातमी प्रकाशित केली व जिल्हा प्रशासन हादरले. त्यातच लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेतली. न.प. बगीचा हद्दीत असलेल्या रिकाम्या इमारतीची मुख्याध्यापक एन.एस. रहांगडाले यांनी तत्कालीन न.प. अध्यक्ष गौर यांच्याशी चर्चा करुन मागणी केली व जि.प.च्या तीन इमारतीत विद्यार्थ्यांचा अभ्यास वर्ग सुरू केला.
अदानी फाऊंडेशनचे नितीन शिरोडकर यांनीसुद्धा शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक होईल, गरीब विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होऊ नये यासाठी तीन वर्गखोल्या मंजूर करुन कामाला सुरुवात केली. त्यांचे लोकार्पणही झाले. तसेच तीन खोल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत दुरुस्ती हेडमधून नवीन तयार करण्यात आले. त्यांचेही लोकार्पण जिल्हा परिषदचे सदस्य प्रीती रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली, अदानी पॉवरचे व्यवस्थापक सी.पी. शाहू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेश धुर्वे, मोरेश्वर डहाटे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, चेतन पारासर, ओमप्रकाश पटले, जयश्री काळे, श्वेता मानकर, हुपराज जमईवार, प्राचार्य एन.एस. रहांगडाले उपस्थित होते.
प्रास्ताविक एन.एस. रहांगडाले यांनी मांडले. अतिथींनी मार्गदर्शन केले व शाळेला मदत करण्याचे आश्वासन दिले. संचालन आर.जी. देशमुख यांनी केले. आभार डी.एन. उपराडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.