कारंजा शाळेतील विद्यार्थी चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:15+5:302021-03-20T04:27:15+5:30
परिषदेने १४ ते २१ नोव्हेंबर, २०२० या कालावधीत बालदिवस सप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले होते, पण त्या कालावधीत ...
परिषदेने १४ ते २१ नोव्हेंबर, २०२० या कालावधीत बालदिवस सप्ताह म्हणून साजरा करण्याचे ठरविले होते, पण त्या कालावधीत कोरोना महामारीच्या कालखंडात राज्यभरातील शाळा खबरदारीचा उपाय म्हणून बंद असल्याने, महाराष्ट्र शासनाने ऑनलाइनद्वारे या स्पर्धा घेतल्या होत्या. त्यासाठी कारंजा शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून इयत्ता ३ ते ५वी गटातून पत्रलेखन स्पर्धेत प्राची रमेश ढोमने व चेतन पुरुषोत्तम कटंगकार, इयत्ता पाचवीतून सहभागी झाले, तसेच इयत्ता ६ ते ८ या गटातून स्वलिखित कविता वाचनमध्ये अनामिका मधू शहारे, श्रीकांत नंदकिशोर बिलोने यांनी इयत्ता ७वीतून सहभाग नोंदविला होता. या सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक एल.यू. खोब्रागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संचालन एम.टी. जैतवार यांनी केले, तर आभार के.जे. बिसेन यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक मनोज चौरे, देवचंद खोब्रागडे, हेमंत रुद्रकार, नरेश बडवाईक, मंदा कोसरकर, संगीता निनावे, वर्षा कोसरकर, पूजा चौरसिया उपस्थित होते.