शिक्षकांच्या गटबाजीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2017 01:01 AM2017-01-22T01:01:36+5:302017-01-22T01:01:36+5:30
येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावर नियंत्रण कुणाचे नाही अशी परिस्थिती डोळ्यासमोर आहे.
सुकडी/डाकराम : येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावर नियंत्रण कुणाचे नाही अशी परिस्थिती डोळ्यासमोर आहे. येथील शिक्षकांचे दोन गट पडले असून शिक्षकांच्या गटबाजीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. याकडे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी आहे.
सदर जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्ग ५ ते १२ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे प्रभारी प्राचार्य असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांकडे शिक्षण शिकवणी करिता दुर्लक्ष होत आहे. या शाळेमध्ये शिक्षकामध्ये दोन गट निर्माण झाले असून काही शिक्षक शिक्षक खोली मध्ये बसून असतात. प्राचार्याची खोली बदलविल्याने प्राचार्यांचेही शिक्षकांकडे दुर्लक्ष होते. अनेक वर्गामध्ये विद्यार्थी गोंधळ करतात व तासिकांच्या वेळेमध्ये सुद्धा विद्यार्थी व शिक्षक चौकामध्ये जाणे-येण करतात. फेबु्रवारी महिन्याचा दुसऱ्या आठवड्यामध्ये १२ वी च्या बोर्डाची परीक्षा असून सुद्धा १२ वी चा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दहावीची परीक्षा असून दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शिक्षकांच्या गटबाजीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळेचे अध्यक्ष यांचे सुद्धा लक्ष नाही. जि.प. सदस्य या शाळेचे अध्यक्ष असून शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना बरोबर शिकविता किंवा नाही याची दखल घेत नाही.