विद्यार्थिनींनी स्वबळावर कर्तृत्व गाजवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:46 PM2018-01-01T23:46:24+5:302018-01-01T23:46:42+5:30
स्त्री शक्ती ही काळाची गरज असून विद्यार्थिनींनी अधिकाधिक सर्व बाजूनी सक्षम व्हावे आणि स्वबळावर कर्तृत्व गाजवावे असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : स्त्री शक्ती ही काळाची गरज असून विद्यार्थिनींनी अधिकाधिक सर्व बाजूनी सक्षम व्हावे आणि स्वबळावर कर्तृत्व गाजवावे असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांनी केले.
येथील एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्यावतीने जवळील ग्राम कारंजा येथे आयोजीत राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप निरीक्षक सुनील लोंढे, मुख्याध्यापिका सी.एम. कोसरकर, उपसरपंच महेंद्र शहारे, सदस्य लिखीराम बनोटे, लक्ष्मण रामटेके, गिता उईके, सुनीता उईके, रेवता मडावी, सुनीता नागपुरे, भाविका रंगारी, पुरुषोत्तम कावळे, विजय वाघाडे उपस्थित होते.
बहेकार यांनी, स्वच्छतेसह पर्यावरण, ग्रामीण समाज, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि गाव समूहाचे कार्य, शिबिराचे उद्देश, गावकºयांची मदत अशा विविध मुद्यांवर मार्गदर्शन करुन केले.
रामटेके यांनी, गाव स्वच्छता आणि स्त्री शक्तीवर भरपूर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सी.एम. कोसरकर यांनी ग्राम स्वच्छता, हागणदारी मुक्तता आणि शैक्षणिक स्तर यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविकातून कार्यक्रम अधिकारी डॉ. कविता राजाभोज यांनी एन.एस.एस. चे स्वरुप, उद्देश, निर्मिती यासोबतच शिबिराचे उद्देश आणि कार्य यावर प्रकाश टाकला. संचालन विद्यार्थिनी फिरदौर खान, नेहा मेश्राम यांनी केले. आभार डॉ. संतोष शिवणकर यांनी मानले.
शिबिरात चालविल्या जाणाऱ्या चालत्या फिरत्या ग्रंथालयाचे उद्घाटन याप्रसंगी करुन पुस्तके वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते. सकाळी घेण्यात आलेल्या योगा वर्गात गावकरी उपस्थित असून सर्वांनी उत्साहात योगक्रिया केल्या. योगा शिक्षक संजय अग्रवाल यांनी विविध आजारावर कोणती योगासने उपयोगी पडतात हे सांगून प्रात्यक्षिक करवून घेतले.