विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 09:57 PM2017-12-30T21:57:52+5:302017-12-30T21:58:05+5:30
दररोज आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. निसर्गात घडणाऱ्या घटनांविषयी उत्सुकता बाळगणे व ते जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचणे यातूनच विज्ञानाची निर्मिती होते. अनादी काळापासून विज्ञान हे सर्वव्यापी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : दररोज आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. निसर्गात घडणाऱ्या घटनांविषयी उत्सुकता बाळगणे व ते जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचणे यातूनच विज्ञानाची निर्मिती होते. अनादी काळापासून विज्ञान हे सर्वव्यापी आहे. ते जाणून घेण्यास आपण सक्षम असले पाहिजे. आपल्या पूर्वजांकडून प्रतिजैविक तयार करण्याची परंपरा आजही सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्याकरिता वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा, असे प्रतिपादन ग्राम कुºहाडी येथील रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक गजानन पांडे यांनी केले.
येथील आदर्श विद्यालयात बुधवारी (दि.२७) आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्यात ते बोलत होेते. उद्घाटन माजी आमदार केशवराव मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, प्राचार्य डी.एम. राऊत, परीक्षक डॉ. शिल्पा पारधी, मनोज रहांगडाले, पर्यवेक्षक सी.बी. पारधी, अनिल जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मानकर यांनी, विद्यार्थ्यांनी फक्त विज्ञान शाखेकडेच न वळता व्यावसायीक शिक्षण सुद्धा घेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण व्यवसाय, मार्गदर्शन कार्यालयाचे सहायक सचिव ए.झेड. फुलझेले यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखून पुढील जीवनाची दिशा निर्धारित करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र तंत्रशिक्षण व तंत्र संचालनालय (मुंबई) यांच्यावतीने फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा २०१७ चे आयोजन करण्यात आले होते.
या अपूर्व विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १८५ विज्ञानाचे प्रयोग (तांत्रिक), ४० गणिताचे मॉडेल्स व ६० कलाप्रदीतचे मॉडेल सादर केले. यातील १५ उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात आली. परिक्षणाचे कार्य शिल्पा पारधी व मनोज रहांगडाले यांनी केले. संचालन पी.पी. बिसेन यांनी केले. मेळाव्यासाठी विज्ञान शिक्षक एस.डी. पुरी, सुनील मानकर, उके, अनिल कटरे, योगेश मेश्राम यांनी सहकार्य केले.