विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा

By admin | Published: November 30, 2015 01:36 AM2015-11-30T01:36:06+5:302015-11-30T01:36:06+5:30

लोधी शक्ती संघटनेच्या वतीने लोधी समाज कॅरिअर गाईडेन्स कमिटी आमगाव-सालेकसाच्यावतीने लोधी समाजातील दहावी आणि त्यापुढे अभ्यास करणाऱ्या

Students should study wholeheartedly | विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा

विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा

Next

राजपूत यांचे मत : लोधी समाज कॅरियर मार्गदर्शन
आमगाव : लोधी शक्ती संघटनेच्या वतीने लोधी समाज कॅरिअर गाईडेन्स कमिटी आमगाव-सालेकसाच्यावतीने लोधी समाजातील दहावी आणि त्यापुढे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅरिअर गाईडेन्स कार्यक्रमाचे आयोजन येथील लक्ष्मणराव मानकर शिक्षण महाविद्यालयात करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी आमगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार भेरसिंह नागपुरे होते. उद्घाटन लांजी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार भागवत नागपुरे यांनी केले. यावेळी पाहुणे म्हणून पं.स.चे माजी सभापती यादनलाल बनोटे, लोधी शक्ती संगठनेचे संयोजक अ‍ॅड. येशूलाल उपराडे, लोधी युवा संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सौ. अनुपमा लोधी, कुंवरलाल मच्छिरके, आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गेंदसिंह मच्छिरके, शहीद अवंती स्मारक समिती गोंदियाचे अध्यक्ष शिव नागपुरे, लोधी क्षत्रीय समाज रायपुरचे कोषाध्यक्ष राजेश नागपुरे, लोधी समाज कॅरिअर गाईडेन्सचे अध्यक्ष प्रेमचंद दसरिया उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उडीसा शासनाचे आयुक्त एन.बी.एस. राजपुत, बँक शाखा व्यवस्थापक लिलाधर सुलाखे, विकास खडे, शिक्षणाधिकारी साहेबलाल दसरिया, समाजसेवी अभियंता राजीव ठकरेले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान लोधेश्वर, शंकर, माता सरस्वती व विरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने करण्यात आली. अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. मार्गदर्शन करताना राजपूत म्हणाले की विद्यार्थ्यांनी मन लाऊन अभ्यास करावे. लक्ष प्राप्तीसाठी नियमित अभ्यास करण्याची गरज आहे. आपले उद्देश पुर्तीसाठी जास्त मेहनत करण्याचे आवाहन केले. बँक व्यवस्थापन लिलाधर सुलाखे यांनी बँकींग क्षेत्रात कसे कॅरिअर करावे हे सांगितले. शिक्षणाधिकारी साहेबलाल दसरिया यांनी शिक्षण क्षेत्रात प्रगती कशी करावी याची संपूर्ण माहिती दिली. या युगात इंटरनेटच्या माध्यमातून गुगल, व्हॉसअप, नोकरी डॉटकाम या माध्यमातून घरीच आपला कॅरिअर बनवू शकतो असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात लोधी युवा संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुपमा लोधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करुन आपली संपूर्ण शक्ती अभ्यासासाठी लावली पाहिजे. उद्घाटकीय भाषणात माजी आ. नागपुरे म्हणाले की ही पहली वेळ आहे की आज लोधी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅरिअर गाईडेन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या फायदा लोधी समाजाच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. लोधी समाजाच्या युवकांनी प्रशासनीक सेवेत जाण्यासाठी भरसक प्रयत्न करावे त्यांनी कॅरिअर गाईडेन्स कार्यक्रम आजची गरज आहे तसेच लोधी समाजाच्या युवकांना भारतीय प्रशासनीक जावे असे आवाहन केले.
लोधी समाजाच्या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी सोमेशकुमार बल्हारे, हुजुरदास माहुले, नंदकिशोर बोहने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शंकर नागपुरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक लोधी समाज कॅरिअर गाईडेन्स कमिटीचे अध्यक्ष प्रेमचंद दसरिया यांनी केले. संचालन कमिटीचे सचिव चरणदास डहारे यांनी तर आभार राजकुमार बसोने यांनी मानले.
यशस्वितेकरिता लोधी समाज कॅरिअर गाईडेन्स कमिटीचे उपाध्यक्ष जागेश्वर लिल्हारे, रंजितसिंह मच्छिरके, कबीरदास माहुले, नंदेराव मोहारे, महेंद्र कुराहे, रामचंद लिल्हारे, रविंद्र उपवंशी, अरविंद बनोटे, ज्ञानीराम बनोटे, केवलचंद मच्छिरके यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोधी युवक-युवती, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Students should study wholeheartedly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.