तालुका बौध्द महासभेचा अभ्यास दौरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:30 AM2021-04-04T04:30:00+5:302021-04-04T04:30:00+5:30
सालेकसा : भारतीय बौध्द महासभा तालुका सालेकसाच्यावतीने यंदा अभ्यास दौरा काढून छत्तीसगडच्या महानदीच्या तीरावर स्थित प्राचीन बौध्द कालीन राजवटीची ...
सालेकसा : भारतीय बौध्द महासभा तालुका सालेकसाच्यावतीने यंदा अभ्यास दौरा काढून छत्तीसगडच्या महानदीच्या तीरावर स्थित प्राचीन बौध्द कालीन राजवटीची नगरी सिरपूर येथे भेट देऊन प्राचीन काळातील शासन व्यवस्था नगर रचना व शैक्षणिक व्यवस्था याबद्दल सखोल माहिती जाणून घेतली.
देशातील सर्वात रुंद नदी म्हणून ओळखली जाणारी छत्तीसगड आणि ओरीसा राज्यात वाहत असलेली महानदीचा प्राचीन काळापासून मोठे महत्व राहिले आहे. या नदीच्या तीरावर भारतीय संस्कृतीचे अनेक घटक उद्याला आले असून जल क्षेत्रात सुध्दा महानदीच्या महत्वाचा स्थान आहे. या नदीच्या तीरावर ठिकठिकाणी अनेक राज्याच्या राजवटी विकसीत होऊन ऐतिहासिक वैभव प्राप्त करणाऱ्या नगरीय व्यवस्था आजच्या युगात सुध्दा प्रासंगीक वाटत आहेत. त्यापैकी एक नगर रचना महासमुंद जिल्ह्यात सिरपूर येथे महानदीच्या किनाऱ्यावर उद्याला आली आणि काळातरांने तिचे पतन ही झाले. मात्र इतिहासाच्या अभ्यास करताना या उध्वस्त झालेल्या नगरीतून सुध्दा बौध्द अनुयायी सोबतच इतिहासकार व संशोधनकर्त्यांना बरेच काही शिकायला मिळत आहे. अभ्यास दौरा सालेकसा येथील अभ्यास मंडळातील सदस्यासाठी चिरस्मरणीय ठरलेला आहे. यात सचिव समाज उके, सल्लागार खेमराज साखरे, युवराज लोणारे, निर्दोष साखरे, अनिल तिरपुडे, अशोक शेंडे, कस्तुरचंद जोग, सुजीत बंसोड, प्रमोद कोटांगले, राहुल देऊळकर, मुकेश टेंभुर्णीकर, राजेंद्र वालदे, वर्षा मेश्राम, विद्या राऊत, गीता गोंडाणे, रमेश करवाडे, रंजीत चंद्रिकापुरे, खिलेश बडोले, दक्ष मेश्राम,यामीनी देऊळकर यांचा समावेश होता.