सुकळीचा विशाल बनला उपजिल्हाधिकारी

By Admin | Published: April 11, 2015 01:45 AM2015-04-11T01:45:31+5:302015-04-11T01:45:31+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील

The subdivision became a huge sub-collector | सुकळीचा विशाल बनला उपजिल्हाधिकारी

सुकळीचा विशाल बनला उपजिल्हाधिकारी

googlenewsNext

गावकऱ्यांची छाती फुगली : जिद्द आणि परिश्रमाने कमावले यश
संतोष बुकावन ल्ल अर्जुनी-मोरगाव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील विशालकुमार शालीकराम मेश्राम याने बाजी मारून उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विदर्भातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत यश संपादन केले. त्यात गोंदिया जिल्ह्यातून विशालकुमार एकमेव आहे.
परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तो २ मे पासून यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेणार आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसाधारण कुटुंबातून हे यश संपादन करणाऱ्या विशालकुमारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अवघे ६८४ लोकसंख्या असलेले सुकळी हे गाव अर्जुनी मोरगावपासून ३ किमीवर आहे. या गावात उच्च पदस्थांची खाण आहे. विशालकुमारचे प्राथमिक शिक्षण सिरोंचा व जि.प. प्राथमिक शाळा सकुळी-खैरी येथे झाले आहे. पाचवा वर्ग पंचशिल विद्यालय बाराभाटी तर ६ ते १२ पर्यंतचे शिक्षण सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथून पूर्ण केले. त्यानंतर श्री गुरुगोविंदसिंग इन्स्टीट्यूट आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली.
या पदवीनंतर त्याला चेन्नई येथील कंपनीत नोकरीची संधी होती, मात्र त्यात लोकसेवा नव्हती, त्यामुळे त्याचे मन रमले नाही. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या मोठा भाऊ संतोषने हिंमत दिली आणि विशालने एमपीएससीचा मार्ग धरला. पुणे येथे जाऊन शिकवणी वर्गात शिक्षण घेतले. पहिल्या परीक्षेत अपयश आले. भावाने धीर दिला. त्यानंतर पुन्हा जिद्दीने अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नात २०१३ मध्ये विक्रीकर अधिकारी व खंडविकास अधिकारी परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या वरुड पंचायत समितीमध्ये परीविक्षाधिन खंडविकास अधिकारी पदावर कार्यरत असतानाच उपजिल्हाधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेतही तो उत्तीर्ण झाला.
विशालचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वाहनचालक होते. ते ५ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. आई चौथा वर्ग शिकली असून गृहिणी आहे. एक भाऊ इंजिनिअर, दुसरा पोलीस उपनिरीक्षक आहे, तर बहिण अपेक्षा हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली मात्र तिची निवड झाली नाही. तिचे प्रयत्न त्या दिशेने सुरूच आहेत.
यापुढे माझे आयएएस बनण्याचे स्वप्न असल्याचे विशाल मेश्राम यांनी सांगितले.

अपयशातूनच यश गाठता येत
जीवनात अपयश येतच असते. अपयशातून यशप्राप्ती होते. मात्र त्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम व संयमाची गरज असते. अपयशाने खचून न जाता वाटचाल सुरु ठेवल्यास तुम्हाला पुढे कुणीही थांबवू शकत नाही. कुणाची तरी प्रेरणा व आत्मविश्वास या बाबी महत्वपूर्ण आहेत. झालेल्या चुका दुरुस्त करुन मार्गक्रमण करावे, असे विशालकुमार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला.
४ ग्रामीण भागात न्युनगंड असतो. परिक्षेविषयी अनामिक भीती असते. विद्यार्थ्यांत अमाप गुणवत्ता आहे. मात्र मार्गदर्शन व दिशानिर्देशांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय, उद्दिष्ट ठेवले पाहिजे. यामध्ये प्राप्तीसाठी निरंतर व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास निश्चितच यशप्राप्ती होते, असे विशालकुमार मेश्राम यांनी सांगितले.

Web Title: The subdivision became a huge sub-collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.