डम्पिंग यार्डचा विषय दोन वर्षांपासून रेंगाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:15+5:30

नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे अत्यंत आवश्यक आहे. असे असतानाही १०० वर्षांच्या गोंदिया नगर परिषदेला याचे काहीच सोयरसुतक नाही. नगर परिषद फक्त जागा शोधते व त्यानंतर विसरून जाते असाच प्रकार आजपर्यंत सुरू आहे. नगर परिषदेने टेमनी, रापेवाडा व त्यानंतर आणखीही काही जागा बघितल्या. मात्र काहीना काही कारणांमुळे त्यांचे काम रखडले.

The subject of dumping yards lingered for two years | डम्पिंग यार्डचा विषय दोन वर्षांपासून रेंगाळत

डम्पिंग यार्डचा विषय दोन वर्षांपासून रेंगाळत

Next
ठळक मुद्देनोटीसनंतर सुरू झाली धावपळ : कारवाईनंतर कामाची नगर परिषदेला लागली सवय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जवळील ग्राम रतनारा येथे घन कचरा प्रकल्प उभारण्यासाठी नगर परिषदेने जागेची पाहणी केली आहे. आता याला प्रकरणाला दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून हा विषय रेंगाळत चालला आहे. टास्क फोर्सने नगर परिषदेला नोटीस दिल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेला कोणती कारवाई झाल्यानंतर कामाला लागण्याची सवय जडल्याचे चित्र आहे.
नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे अत्यंत आवश्यक आहे. असे असतानाही १०० वर्षांच्या गोंदिया नगर परिषदेला याचे काहीच सोयरसुतक नाही. नगर परिषद फक्त जागा शोधते व त्यानंतर विसरून जाते असाच प्रकार आजपर्यंत सुरू आहे.
नगर परिषदेने टेमनी, रापेवाडा व त्यानंतर आणखीही काही जागा बघितल्या. मात्र काहीना काही कारणांमुळे त्यांचे काम रखडले. त्यात दोन वर्षांपूर्वी ग्राम रतनारा येथे जागा पाहण्यात आली. मात्र जागा बघून झाल्यानंतर तो विषय रेंगाळत चालला आहे. प्रकल्पाच्या जागेबाबत विचारणा केली असता एकमेकांकडे बोट दाखविणे व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे नाव सांगून मोकळे होणे हाच प्रकार बघावयास मिळतो. यामुळेच रतनारा येथील जागेचा विषय मार्गी लागला नाही.
आपल्याकडे जागाच नसल्याचे कारण पुढे करून स्वच्छता विभागाकडून मोक्षधाम परिसरात डपिंग यार्ड बनविण्यात आले आहे. शिवाय लगतच्या गावांतही कचरा फेकून आपले काम काढले जात आहे. अखेर नगर परिषदेचा वेळकाढूपणा टास्क फोर्सच्या नजरेत आला व नगर परिषदेला दणका दिल्यानंतर मंगळवारी (दि.२१) नगर परिषदेत चांगलीच खळबळ व स्वच्छता विभागात धावपळ दिसून आली. विशेष म्हणजे, स्वच्छता विभागातील अभियंता आता महिनाभरात प्रकल्प उभा करण्याच्या गोष्टी करीत आहेत. मागील दोन वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळत असताना कुणीही त्यासाठी धावपळ केली नाही.
आता मात्र टास्क फोर्सने दणका दिल्यानंतर सर्वांची तारांबळ उडाली असून कारवाईसाठी धावपळ सुरू झाली आहे.

चुलोदच्या जागेला घेऊनही फसगत
लगतच्या ग्राम चुलोद परिसरात नगर परिषदेच्या गाड्या कचरा फेकत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. आपल्या घरातील कचरा दुसºयाच्या घरात टाकण्यासारखा हा गंभीर विषय असतानाही स्वच्छता विभागातील जवाबदार कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ‘काही होत नाही’ या आवात महत्त्वााच्या बाबींकडे ते दुर्लक्ष करीत असल्याचे नेहमीच बघावयास मिळते. तोच प्रकार येथेही घडला व चुलोदमध्ये कचरा फेकण्याच्या विषयाकडे त्यांनी लक्ष दिले नाही. मात्र या प्रकराला घेऊन टास्क फोर्सने दणका देताच आता सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवर मौन?
नगर परिषदेत एका एजन्सी अंतर्गत कंत्राटी तत्वावर काही विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम भरण्यात आली नाही. यासंबंधि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाने नगर परिषदेला नोटीस दिले आहे. मात्र या गंभीर प्रकारावर अद्यापही कसलीच कारवाई करण्यात आली नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा याप्रकरणी सदर कंपनी आणि नगर परिषदेवर कुठलीच कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

पगाराच्या विषयातही टास्क फोर्सच्या मध्यस्थीची गरज
एका एजंसीच्या माध्यमातून नगर परिषदेच्या विविध विभागात कार्यरत कर्मचाºयांचे ८-१० महिन्यांचे पगार अडकून आहेत. विशेष म्हणजे, संबंधीत एजंसी संचालक खुद्द पगाराच्या विषयाला घेऊन आता संपाच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यावरून नगर परिषदेने क्षमतेपेक्षा जास्तीचा व्याप घेतल्याचे दिसते. मागील वर्षभरापासून हा विषय सुरू असताना अधिकारी व पदाधिकारी कुणीही काहीच कारवाई करायला धजावत नाही. आश्वासनाचा भोपळा देऊन सर्वच आपला मार्ग धरत असल्याचेही दिसत आहे. यातून एखाद्या मोठ्या व्यक्तीचा यात हात असल्याचेही बोलले जात आहे.आता गरीब कर्मचाºयांच्या पगाराचा प्रश्नही टास्क फोर्सनेच मार्गी लावावा अशी मागणी केली जात आहे.
न.प.च्या भोंगळ कारभाराला जवाबदार कोण
गोंदिया नगर परिषदेत मागील पाच सहा महिन्यांपासून बराच भोंगळ कारभार सुरू आहे. यावर आता शहरवासीय सुध्दा उघडपणे टिका करु लागले आहे. मागील दोन अडीच वर्षांच्या कालावधीत शहरात सांगण्यासारखे असे एकही विकास काम झाले नाही. शहरातील नाल्या गटारे केरकचऱ्यांनी तुंबली आहेत. थोडाही पाऊस झाल्यास रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचते. तर शहरातील रस्ते खड्डे मुक्त केव्हा होणार असा सवालही शहरवासीय उपस्थित करीत आहे. एकंदरीत नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराला नेमके जवाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: The subject of dumping yards lingered for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dumpingकचरा