निधी मागणीचे प्रस्ताव त्वरित सादर करा : धर्मरावबाबा आत्राम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:02 PM2024-08-16T17:02:28+5:302024-08-16T17:03:17+5:30

जिल्हा नियोजन समिती बैठक : निधी वेळेत खर्च करण्याच्या केल्या सूचना

Submit fund demand proposal immediately : Dharmaraobaba Atram | निधी मागणीचे प्रस्ताव त्वरित सादर करा : धर्मरावबाबा आत्राम

Submit fund demand proposal immediately : Dharmaraobaba Atram

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
जिल्हा नियोजन समितीमार्फत करावयाच्या विविध विकासकामांच्या निधी मागणीचे प्रस्ताव अंमलबजावणी यंत्रणांनी तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केल्या. गुणवत्तापूर्ण कामांसह निधी वेळेत खर्च करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. १४) आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खा. प्रफुल्ल पटेल, नामदेव किरसान, डॉ. प्रशांत पडोळे, जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, आ. डॉ. परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, सहसराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी प्रजित नायर जिप  मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, विशेष निमंत्रित सदस्य राजेंद्र जैन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, निमंत्रित सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सिटी सव्र्व्हेचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आला. हा प्रकल्प पुढील पाच ते सहा महिन्यांत मार्गी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले. सिटी सर्व्हेसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच लाख लागवडीसाठी जिल्हाभर नियोजन करावे, असे बैठकीत सांगण्यात आले. 


जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्र बाह्य योजना सन २०२३-२४ मध्ये यंत्रणांनी निन्दी योजनांचा शंभर टक्के खर्च केला आहे. या खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.


गोंदिया शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. जन सुविधा व नागरी सुविधा अंतर्गत कामे, जिल्हा क्रीडा संकुलातील कामे, खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ, काशिनाला व कुआढास नाला प्रकरण, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे रेडिऑलॉजिस्ट डॉक्टरची नियुक्ती करणे, गोंदिया रेल्वे स्टेशन सराफा लाईनजवळ पोलिस चौकीची मागणी आदी विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. ओबीसी वसतिगृहाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जागा उपलब्ध झाली असून निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या


सर्व पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर आणा
जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना सोलरवर आणाव्यात, असे निर्देश पालकमंत्री यांनी या वेळी दिले. सोबतच अर्धवट योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या.


त्या मृतक बालकांच्या कुटुंबीयांना १० लाखांच्या मदतीचा ठराव
गोंदिया तालुक्यातील दासगाव बु. येथील जिल्हा परिषद हिंदी पूर्वमा- ध्यमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दोन्ही मृतक विद्यार्थ्यांना नियोजन समितीच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला.


आदिवासी उपाययोजनांचा शंभर टक्के निधी खर्ची
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्र बाह्य योजना सन २०२३-२४ मध्ये यंत्रणांनी तिन्ही योजनांचा शंभर टक्के खर्च केला आहे. या खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 

Web Title: Submit fund demand proposal immediately : Dharmaraobaba Atram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.