आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:41 PM2017-11-24T22:41:44+5:302017-11-24T22:41:54+5:30

येथील नगरसेवकांनी नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने घेतली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी (दि.२४) येथील नगर पंचायतला भेट दिली.

Submit inquiry report in eight days | आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करा

आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करा

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : नगरसेवकांच्या इशाºयाची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : येथील नगरसेवकांनी नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने घेतली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी (दि.२४) येथील नगर पंचायतला भेट दिली. तसेच तहसीलदारांना मुख्याधिकाºयांविरुध्द असलेल्या तक्रारींची आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
नगराध्यांक्षसह १३ नगरसेवकांनी गुरूवारी (दि.२३) रोजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन ३० नोव्हेंबरपर्यत मुख्याधिकारी निलंबनाची कारवाई न केल्यास १ डिसेंबरला नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याचीच दखल पालकमंत्र्यांनी घेतली. तसेच नगर पंचायतला भेट देत तहसीलदार आणि मुख्याधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. कार्यालयाचा आवक-जावक रजिस्टरची सुद्धा त्यांनी पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार परळीकर यांना नगर पंचायत कार्यालयाकडून जेवढ्या तक्रारी आहेत. त्या अनुरुप चौकशी अहवाल तयार करुन मला आणि जिल्हाधिकाºयांना सादर करण्याचे निर्देश दिले. या वेळी नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, देवचंद तरोणे, ज्योती गिºहेपुंजे, अभय राऊत, दिनेश अग्रवाल, दासू येरोला, महेश सूर्यवंशी, जनाबाई मडावी, कविता पात्रे, रेहान शेख, जिजा पटोले, प्रियंका उजवणे, चंद्रकला मुनीश्वर, मोहनकुमार शर्मा उपस्थित होते.

Web Title: Submit inquiry report in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.