स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 22:32 IST2022-10-02T22:31:07+5:302022-10-02T22:32:01+5:30
गोरेगाव येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार रहांगडाले यांनी मागणी केली होती. यावर फडणवीस यांनी विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. यावर योजना तातडीने सुरू करण्यासह क्षेत्रातील अन्य विकासकामांना घेऊन आमदार रहांगडाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक बोलाविली होती.

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे सादर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गोरेगाव येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे सादर करा, असे निर्देश आमदार विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाला दिले.
गोरेगाव येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार रहांगडाले यांनी मागणी केली होती. यावर फडणवीस यांनी विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. यावर योजना तातडीने सुरू करण्यासह क्षेत्रातील अन्य विकासकामांना घेऊन आमदार रहांगडाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच नगरपरिषद तिरोडा येथील महात्मा फुले वाॅर्ड येथील अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करणे, नगर पंचायत गोरेगाव येथील शासकीय जागेवर अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करणे, श्रीरामपूर पुनर्वसन येथील पट्टे नियमानुकूल करणे, अनुसूचित जाती व अन्य परंपरागत वननिवासीधारकांना वनहक्क दावे मंजूर करणे, निमगाव आंबेनाला प्रकल्पाचे काम आदी महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हाधिकारीनयना गुंडे, मजीप्राचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता, तिरोडा व गोरेगावचे तहसीलदार, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार उपस्थित होते.