गर्भाशय कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्पचे यशस्वी आयोजन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:58+5:302021-03-09T04:32:58+5:30
या शिबिराचे उदघाट्न अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. तिरपुडे यांनी गर्भाशयाचा कॅन्सर कसा टाळता ...
या शिबिराचे उदघाट्न अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. तिरपुडे यांनी गर्भाशयाचा कॅन्सर कसा टाळता येतो. रोग झाल्यास त्यावरील उपचार पद्धतीविषयी रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना सखोल माहिती दिली. या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी स्त्री रोग विभागाच्या प्रभारी प्रमुख डॉ. गरिमा बग्गा यांनी सहकार्य केले. ५ ते ८ मार्च दरम्यान दररोज सकाळी ९ ते दुपारी १ वाजता या कालावधीत प्रत्येक दिवशी १५ ते १६ रुग्णांचे स्क्रिनिंग करून त्याचा अहवाल गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांना सादर करण्यात आला. याप्रसंगी शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर जयस्वाल, सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. गौरव बग्गा, वरिष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ. सायस केंद्रे, डॉ. सोनारे उपस्थित होते.