ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:26 AM2019-03-10T00:26:55+5:302019-03-10T00:27:26+5:30
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.५) मोर्चा काढून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.५) मोर्चा काढून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची शुक्रवारी (दि.८) यशस्वी सांगता करण्यात आली.
कर्मचाºयांच्या ज्येष्ठता यादी मधून एकूण मंजूर रिक्त पदाचे १० टक्के आरक्षणाच्या नियमांतर्गत वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदावर कर्मचाºयांची नियुक्ती करणे, वेतनाकरीता आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करुन बँक खात्यावर पूर्ण वेतन, भत्ता, पीएफ जमा करणे, शंभर टक्के शासकीय वेतन अनुदानासाठी ९० टक्के कर वसुलीची अट रद्द करणे, शेवाशर्तीची अंमलबजावणी करणे, करवसुलीसाठी जवाबदार ग्रा.पं.कार्यकारिणी व ग्रामसेवकांवर नियमाप्रमाणे कार्यवाही करणे, वेतनश्रेणी लागू करण्याकरीता यावलकर समितीच्या सिफारशी जाहिर करून अंमलबजावणी करणे इत्यादी मागण्यांना घेवून महासंघाचे राज्य संघटक मिलींद गणवीर व जिल्हाध्यक्ष कय्यूम शेख यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन मंगळवारपासून (दि.५) सुरू होते.
दरम्यान, मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी यांनी शिष्टमंडळाला आमंत्रीत केल्यानंतर जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, मनोज डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा केली. चर्चेत त्यांनी, जि.प.सेवेत सामावून घेण्याकरीता ३२ कर्मचाºयांची नियुक्ती देण्याची प्रक्रिया अंतीम टप्यात असून इतर मागण्यांबाबत त्वरीत कार्यवाही करणे तसेच पं.स.बिडीओ व महासंघाच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर शुक्रवारी (दि.८) आंदोलनाची सांगता करण्यात आली. उपस्थितांचे आभार शेख यांनी मानले.