अचानक वीज गायब; आता एका क्लिकवर झटपट सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 06:04 PM2024-09-06T18:04:57+5:302024-09-06T18:05:27+5:30
महावितरणने सुरू केली 'ऊर्जा चॅट बॉट' सेवा : ग्राहकांना होणार मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वीज खंडित होणे तशी सर्वसामान्य बाब आहे; परंतु अशा स्थितीत महावितरणशी संपर्क होत नाही, तेव्हा ही समस्या अधिक गंभीर होते. टोल फ्री नंबरवर कॉल घेतला जात नाही.
कार्यालयात गेल्यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही. अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र, आता महावितरणने 'ऊर्जा चॅट बॉट' ही सेवा सुरू केली आहे. याचा वापर करून ग्राहकांना फक्त एका क्लिकवर त्वरित सेवा मिळू शकते. अचानक वीज गेली, बराच वेळ झाला वीज आली नाही, कार्यालयात संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही, वीज ग्राहकांची ही सर्वसामान्य आणि प्रत्येकाचीच तक्रार आहे. यावर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महावितरणने 'ऊर्जा चॅट बॉट' ही सेवा सुरू केली आहे. यासोबतच इतर अनेक सुविधाही येथे दिल्या आहेत.
काय आहे 'ऊर्जा चॅट बॉट'? 'चॅट बॉट' हा एक संगणकीय प्रोग्राम आहे, हे लिखित किंवा बोललेल्या संभाषणाचे अनुकरण करते. त्याच्याशी इतर कोणत्याही व्यक्त्तीसारखे बोलले जाऊ शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऊर्जा चॅट बॉटची सेवा महावितरणच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर २४ बाय ७ उपलब्ध आहे. याद्वारे ग्राहक महावितरणच्या सेवांबाबत इंग्रजी आणि मराठीत प्रश्न विचारू शकतात. त्यातून नवीन कनेक्शन, बिल भरणा, तक्रारी याबाबतची माहिती मिळू शकते.
कसा करणार वापर?
वेबसाइट : कंपनीच्या वेबसाइटला भेट दिल्यावर, चॅट बॉटसाठी समानार्थी शब्द दिसेल. यावर क्लिक करून ग्राहक त्यांचे प्रश्न विचारू शकतात.
मोबाइल अॅप : तुमच्या स्मार्ट फोनमध्ये महावितरणचे मोबाइल अॅप डाउनलोड करा. अॅपच्या चॅट बॉटवर क्लिक करून प्रश्न विचारले जाऊ शकतात.
या सेवा आहेत उपलब्ध
- वीज खंडित झाल्याची तक्रार, बिले, नवीन जोडण्यांबाबत तक्रारी करा.
- बिल माहिती मिळवा. बिलदेखील येथे पाहिले आणि डाउनलोड केले जाऊ शकते. प्रश्नही विचारता येतील.
- नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी आवश्यक माहिती आणि प्रक्रिया तुम्हाला मिळू शकते.
- महावितरणच्या विविध योजनांची माहिती मिळू शकते.
- विजेच्या वापराबाबतही माहिती मिळू शकते
समस्यांवर त्वरित उपाय : महावितरण
ग्राहकांना चांगली सुविधा दिल्याचा दावा महावित- रणने केला आहे. चॅट बॉटच्या मदतीने ग्राहकांना त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. ग्राहकांच्या समस्या लवकरच दूर केल्या जातील