आत्मदहनाचा प्रयत्न १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा
By admin | Published: June 3, 2017 12:16 AM2017-06-03T00:16:14+5:302017-06-03T00:16:14+5:30
मागील दोन वर्षांपासून कुठेही समायोजन न झाल्याने, वेतनाअभावी आर्थिक विवंचनेत असलेल्या १४ आश्रम शाळेतील
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन वर्षांपासून कुठेही समायोजन न झाल्याने, वेतनाअभावी आर्थिक विवंचनेत असलेल्या १४ आश्रम शाळेतील १७ कर्मचाऱ्यांनी देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर गुरूवारी (दि.१) येथे अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्या १७ कर्मचाऱ्यांवर देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १८८, ३०९ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घनशाम भरतराम गुरूमार्गी (५०) (स्वयंपाकी) रा. जांभळी-दोडके, निलकंठ प्रभू मेश्राम (५४) रा. चोपा ता. गोरेगाव, व्यंकटराव लक्ष्मण वाघमारे (५४) (स्वयंपाकी) रा. तिल्ली, राजकुमार सुरजलाल कुंभरे (५३) (कामाठी) रा. जांभळी-दोडके, लक्ष्मण गोबरी करचाल (४५) (कामाठी) रा. सडक-अर्जुनी, सोना वारलू चाचेरे ( ४२) (स्वयंपाकी) रा. मोहाडी, घनशाम श्यामराव फुंडे (३४) (मदतनिस) रा. चिचटोला, मनोज सुखदेव वानखेडे (३९) (स्वयंपाकी) रा. सडक-अर्जुनी, अशोक दशरथ टेकाम (४९) (स्वयंपाकी) रा. सडक-अर्जुनी, आशिष तुलसीदास शहारे (४२) रा. खाडीपार, देवलाल गंभीर पडोरी (४५) (स्वयंपाकी) रा. कुडवा, सुरेश तुलाराम साखरे (४६) (कामाठी) रा. सिंदीबिरी, भोजराज श्यामराव फुंडे (३४) अध्यक्ष आदिवासी आश्रम शाळा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोंदिया/भंडारा, समन्वयक भरत बी मडावी (४०), सचिव विलास बी. सपाटे या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.