उन्हाळी धानपिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:28 PM2017-12-05T22:28:48+5:302017-12-05T22:29:08+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकºयांचे हित व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी तालुक्यात उन्हाळी धानपीक लावण्याची परवानगी द्यावी,...

Summer Prescription Demand | उन्हाळी धानपिकांची मागणी

उन्हाळी धानपिकांची मागणी

Next
ठळक मुद्देसंघटनेची मागणी : शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी तालुक्यात उन्हाळी धानपीक लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी धान उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीला घेऊन सोमवारी संघटनेच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदनही देण्यात आले.
जिल्ह्यात अपुºया पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रात रोवणी प्रक्रि याही होऊ शकली नाही. गेल्या ४ दशकांत पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे. शासनाकडून जिल्हा दुष्काळग्रस्त करण्याची अपेक्षा असताना अद्यापही ती पूर्ण होऊ शकली नाही. केवळ तीन तालुक्यांत अल्पशा दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अर्जुनी-मोर तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे तालुक्यात असलेल्या उपलब्ध जलसाठ्यातून शेतकऱ्यांना उन्हाळी धान पीक दिल्यास निश्चितच खरीप हंगामाचे नुकसान भरून निघण्यास मोठी मदत होणार आहे.
दरवर्षी तालुक्यात १० हजार ५९० हेक्टर कृषी क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड होत असते. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून शहराकडे पलायन करण्याची आवश्यकताही राहत नाही. तालुक्यात ७० ग्रामपंचायत व एक नगरपंचायत मिळून १६० गावे व वाड्या आहेत. यामुळे १०८ गावांमध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व २५ गावांमध्ये सोलर पंपांच्या योजना कार्यान्वित आहेत. धानपिकाला ७५० मिमी पावसाची गरज असताना यंदा तालुक्यात ९५९ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची प्रशासनाकडे आकडेवारी आहे.
विभागीय भूजल सर्वेक्षणानुसार तालुक्यातील भूजल पातळीही समाधानकारक आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार २२ नोव्हेंबर रोजी अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार व १७ नोव्हेंबर रोजी खंडविकास अधिकारी यांनी पत्र पाठवून तालुक्यात उन्हाळी धान पीक घेण्यास मज्जाव केला. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाहीर नोटीसही लावण्यात आले आहेत. त्यामुळे जलसाठा उपलब्ध असूनही शेतकरी द्विधा मनिस्थतीत आहेत. जिल्हाधिकाºयांनी याकडे विशेष लक्ष देवून तातडीने शेतकºयांना उन्हाळी धान पीक लावण्यास परवानगी द्यावी अन्यथा संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी धान उत्पादक शेतकरी संघटनेद्वारे करण्यात आली आहे.
मागणीसाठी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सेवानिवृत्त कृषी अधीक्षक मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुुरामकर, किशोर तरोणे, बन्सीलाल लंजे, लोकपाल गहाणे, ललित बाळबुद्धे, अश्विन नाकाडे, देवा लंजे, गोपीनाथ लंजे, कवडू गाडेगोणे, लक्ष्मण सोनवाने, महादेव रामटेके, मोहन झोडे, लेकराम कापगते, शालीकराम नाकाडे यांच्यासह मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Summer Prescription Demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.