ज्योतीच्या लग्नात अनेक दानदात्यांचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 09:42 PM2019-04-21T21:42:37+5:302019-04-21T21:43:45+5:30
ज्योती ठाकरे या अनाथ मुलीच्या लग्नात डॉ. सविता बेदरकर व अमरचंद ठवरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सामाजिक दानदात्यांचा हातभार लागला. यातूनच हजारो वºहाड्यांच्या साक्षीने आशीर्वादाच्या गंध अक्षता उधळून ज्योतीचा लग्न सोहळा थाटात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : ज्योती ठाकरे या अनाथ मुलीच्या लग्नात डॉ. सविता बेदरकर व अमरचंद ठवरे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सामाजिक दानदात्यांचा हातभार लागला. यातूनच हजारो वऱ्हाड्यांच्या साक्षीने आशीर्वादाच्या गंध अक्षता उधळून ज्योतीचा लग्न सोहळा थाटात पार पडला.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम सोमलपूर येथील ज्योती व कुणाली ठाकरे या दोघा बहिणी जन्मदात्यांच्या आधार हिरावून गेल्याने ग्राम मांडोखाल येथे मामाकडे राहत आहेत. तालुक्यात जन्मदात्या मायबापांचे छत्र हिरावून बसलेली २० मुले-मुली जीवन जगत आहे. घरामध्ये कमावता नसल्याने पुढील आयुष्य जगायचे कसे हा मोठा यक्ष प्रश्न त्या अनाथांसमोर पडतो. त्यांच्या दैनंदिन जीवनात जन्मदात्यांची उणीव भासू नये म्हणून डॉ. बेदरकर व ठवरे त्यांना सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्नरत राहतात. अशातच, अनाथ ज्योती विवाह योग्य वयात आल्याने तिचा मामा भागवत राऊत यांनी तिच्यासाठी विवाह स्थळ शोधले. मायबाप नसल्याने ज्योतीच्या लग्नासाठी जिल्ह्यातील समाजशील दानशूरांकडून योगदान मिळावे म्हणून ‘लोकमत’च्या माध्यमातून डॉ. बेदरकर, सामाजिक कार्यकर्ते ठवरे यांनी वेळोवेळी मदतीचे आवाहन केले. ‘लोकमत’च्या वृत्ताने अनेकांनी मदत करण्याची इच्छा प्रगट करुन आपल्या परीने ज्योतीच्या लग्न कार्यासाठी खारीचा वाटा उचलला.
लाभला दानदात्यांचा हातभार
ज्योतीच्या लग्न कार्यासाठी गोंदियाचे सेवानिवृत्त तिकीट निरीक्षक कठाणे यांनी संपूर्ण गृहपयोगी भांड्यांचा संच, एस.एस.जे. महाविद्यालयातील प्रा. डॉ. कल्पना सांगोळे यांच्याकडून गोदरेज कपाट, तुळशीकर ब्रदर्श यांच्याकडून कुलर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव नेवारे यांनी कुकर, चांडक बंधू यांच्याकडून गॅस संच, सहकार अधिकारी प्रशांत गाडे, बाजार समितीचे सचिव अशोक काळबांधे, वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले, गोंदियाच्या मंजुषा कार्लेकर, ठाणेदार देशमुख, मनिषा नशिने, आरती चवारे, प्रा. वैशाली कोहपरे, सुनंदा भुरे, डॉ. भूषण मेश्राम, चोयराम गोपलानी, राखी ठाकरे, विश्वदीप डोंगरे, मुन्ना यादव, सुषमा देशमुख, सडक-अर्जुनीचे शिक्षक अनिल मेश्राम, आर.व्ही. मेश्राम, यु.आर. तांदळे, पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे, शालू कृपाले, प्रकाश काशीवार इत्यादींचा या मंगल परिणय सोहळ्यात हातभार लागला.
सुखमय जीवनासाठी मनोकामना
मांडोखाल येथे बुधवारी अनाथ ज्योतीचे लग्न पार पडून वैवाहिक जीवनात समाजसेवी व वºहाड्यांच्या साक्षीने तिने पदार्पण केले. तिचे वैवाहिक जीवन सुखी व आनंदी जावो, अशी मनोकामना करुन आशीर्वाद देण्यासाठी गोंदियाच्या सविता बेदरकर, शालू कृपाले, मनिषा पशिने, अर्जुनी-मोरगावच्या प्रा. कल्पना सांगोडे, गोरेगावच्या वैशाली कोहपरे, सडक अर्जुनीचे अनिल मेश्राम, अमरचंद ठवरे, गडचिरोलीचे समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, विलास लेंडे यांच्यासह हजारो वºहाडी उपस्थित होते.