दुग्धवाढीसाठी सहकार्य करणार

By admin | Published: July 1, 2017 12:19 AM2017-07-01T00:19:00+5:302017-07-01T00:19:00+5:30

शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे.

Support the milk growers | दुग्धवाढीसाठी सहकार्य करणार

दुग्धवाढीसाठी सहकार्य करणार

Next

महादेव जानकर : देवलगाव येथे पशुपालकांसाठी कृती शिबीर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा महत्त्वाचा ठरणार आहे. पशुपालकांनी दुधाळ जनावरांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करावे. पशुपालकांना दुग्धवाढीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
गुरूवारी (दि.२९) अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाअंतर्गत आयोजित कृती शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, दुग्धविकास विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.वाणी, जिल्हा उपायुक्त शहारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच कामदेव कापगते उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार जानकर यांनी, १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी गावोगावी जाऊन पशुपालकांना दुग्धवाढीसाठी मार्गदर्शन व मदत करणार आहेत. या योजनेमुळे निश्चितच दुग्धवाढीसाठी मदत होईल. विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाचा महापूर आणण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असे सांगून त्यांनी, चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपले प्रोत्साहन राहणार आहे. पाळीव जनावरांसाठी सुध्दा अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरु करण्यात येईल. त्यामुळे आजारी दुधाळ जनावराला वेळीच उपचार करता येईल. राज्यात अशाप्रकारे २९८ अ‍ॅम्बुलन्स सुरु करण्यात येणार आहे. दुग्धव्यवसाय हा एटीएम आहे. या व्यवसायामुळे पैसा हाती खेळत असतो. जिल्ह्यात मत्स्य विकासाला सुध्दा चालना देण्यात येईल.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांनी योजनांचा केवळ अनुदानासाठी लाभ न घेता त्या योजना प्रभावीपणे राबविल्यास जीवनमान उंचावण्यास मदत होईल. ओबीसी बांधवांसाठी सुध्दा या योजनांचा लाभ देण्यात येईल असे सांगितले.
पालकमंत्री बडोले यांनी, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या हाती पैसा खेळता राहील. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहे. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमी आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केल्यास चांगले दिवस येण्यास मदत होईल. देवलगाव या गावाची निवड दुग्धवाढीसाठी पथदर्शी प्रकल्पात करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसायाला जिल्ह्यात चालना मिळण्यास हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील दुग्धवाढीसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येईल असे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शहारे यांनी मांडले.
कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गोंडाणे, डॉ.पटले यांच्यासह त्यांच्या विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच देवलगाव येथील ग्रामस्थ व पशुपालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

स्टॉल्सला भेट व
वृक्षारोपण
जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चालना व दुग्ध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आनंद यांचेमार्फत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रत्येकी ८ गाव असे एकूण ६४ गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने निवड केलेल्या देवलगाव येथे या कार्यमोहीम शिबिराचा शुभारंभ दुग्धविकास मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाहुण्यांनी दुधाळ जनावरांची पाहणी करु न पशुसंवर्धन विभागाने लावलेल्या स्टॉलला भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

Web Title: Support the milk growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.