क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:41+5:302021-09-21T04:31:41+5:30
देवरी : शेतकरी-शेतमजूर वर्गाला नेहमीच आमचा पाठिंबा राहिलेला आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याच्या आश्वासनांची पूर्तता खासदार पटेल यांनी पूर्ण ...
देवरी : शेतकरी-शेतमजूर वर्गाला नेहमीच आमचा पाठिंबा राहिलेला आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याच्या आश्वासनांची पूर्तता खासदार पटेल यांनी पूर्ण केली आहे. चिचगडसारख्या मागास भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नांना या भागातील जनतेची साथ हवी आहे. या भागातील लहान-मोठी कामे खासदार पटेल व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पूर्ण करू. त्यासाठी आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्या व क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
तालुक्यातील ग्राम चिचगड येथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते. सभेला आमदार मनोहर चंद्रिकापुरे व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार चंद्रिकापुरे व शिवनकर यांनी, खासदार पटेल यांनी जे कार्य केले आहे त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले पाहिजे. कामांचा प्रसार-प्रचार करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. जि. प. पर्यवेक्षक व बुथप्रमुखांनी गावात बैठका लावून नियोजन करण्याचे काम करावे व प्रत्येक घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. याप्रसंगी परिसरातील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असता त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले.
बैठकीला नरेश माहेश्वरी, सी. के. बिसेन, पारबता चांदेवार, केशव भूते, गोपाल तिवारी, फगनोगी कल्लो, इंदल अरकरा, भैयालाल चांदेवार, भाष्कर धरमसहारे, अमरदास सोनभोईर, सत्यवान देशमुख, बबलू भाटिया, दिलीप दुरूगकर, मुन्ना अन्सारी, राजराम शिवनकर, सेवक बारसे, मनोहर राऊत, सुजित अग्रवाल, तेजराम मडावी, अर्चना ताराम, मीरा कुंजाम, देवविलास भोंगारे, योगेश देशमुख, बबलू पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.