७ लाखाचे बक्षी असलेल्या नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण : ११ वर्षापासून नक्षल चळवळीत होता सक्रीय
By नरेश रहिले | Published: June 19, 2024 07:44 PM2024-06-19T19:44:02+5:302024-06-19T19:44:11+5:30
गोंदिया पोलीसांची यशस्वी कामगिरी
नरेश रहिले, गोंदिया : जहाल माओवादी पहाडसिंग याचा अंगरक्षक म्हणून काम करणारा तसेच दर्रेकसा एरिया कमिटी, प्लॉटून -१, व (सी.एन. एम.) चेतना नाटय मंच मध्ये काम करणारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पोलिस नक्षल चकमकीत काम करणाऱ्या जहाल नक्षलवादी संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम (२५) रा. पुसनार, ता. गंगालूर, जि. बिजापूर ( छत्तीसगड) असे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर ७ लाखाचे बक्षीस होते.
देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबवित आहे. या आत्मसमर्पीत नक्षलवादी बीच्छेम याने जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्यासमक्ष नक्षलवाद्यांच्या त्रासाला कंटाळून ३ जून रोजी आत्मसमर्पण केले आहे. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम याने सन २०१७-२०१८ मध्ये प्लॉटून-१ मध्ये कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत मुरकुटडोह, टेकाटोला, तसेच चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कोसबी जंगल परिसरात घडलेल्या नक्षल- पोलीस चकमकीत सक्रीय सहभाग होता.
माओवाद्यांच्या भूलथापाला बळी पडू नका
माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोदिया जिल्हयात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत आहे. विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला, नागरिकांना माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले आहेत. त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
आत्मसमर्पीत होण्याची सांगितली कारणे
- नक्षल संघटनेचे/चळवळीचे नेमके ध्येयधोरण खालील कॅडर ला कळत नाही. भविष्य अंधकारमय वाटतो. माओवादी संघटनेतील वरिष्ठ कॅडर हे नक्षल चळवळी करीता पैसे/फंड गोळा करण्याबाबत सांगतात. परंतु प्रत्यक्षात सदर पैसा हे स्वतःसाठीच वापरतात.
- शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा माओवाद्यांना पाहिजे तसा पाठींबा मिळत नाही. माओवादी नेते हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक- युवतींचा वापर करुन घेतात.
- दलममध्ये असतांना विवाह झाले तरी वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. परीवारातील सदस्यांना, नातेवाईकांना कोणतीही अडचण असली तरीही मदत करता येत नाही. दलममध्ये असतांना वेळेवर जेवण मिळत नाही. तेथील जिवन फार खडतर असते. आरोग्या विषयीं समस्या, उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही.
- पोलीस दलाच्या सततच्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे. पोलिसांची सारखी भीती वाटते. वरिष्ठ कॅडर हे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निरपराध आदिवासी बांधव/ सामान्य नागरीकांना ठार मारायला सांगतात. महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावित होऊन समर्पण करण्याचा निर्णय घेतला असे बीच्छेम चे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.