स्वच्छ भारत अभियानाची केंद्रीय समितीद्वारे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 09:57 PM2017-12-28T21:57:37+5:302017-12-28T21:57:47+5:30

शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाले असून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या त्रयस्त अशा क्यूसीआय या संस्थेमार्फत देवरी शहराची ओडीएफ व स्वच्छतेसंदर्भात

Survey of the Clean India Campaign by the Central Committee | स्वच्छ भारत अभियानाची केंद्रीय समितीद्वारे पाहणी

स्वच्छ भारत अभियानाची केंद्रीय समितीद्वारे पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाले असून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या त्रयस्त अशा क्यूसीआय या संस्थेमार्फत देवरी शहराची ओडीएफ व स्वच्छतेसंदर्भात पाहणी करण्याकरिता शुक्रवारी (दि.२२) व शनिवारी (दि.२३) रोजी क्यूसीआय समितीने भेट देऊन पाहणी केली.
या वेळी या समितीने देवरी शहरातील ओडीएफ स्पॉट, सार्वजनिक शौचालय व त्यांचा वापर, सोईसुविधा, शहर सौंदर्यीकरण याबाबतीचा आढावा घेतला.
या समितीमध्ये पर्यवेक्षक गोविंद चव्हाण व ऋषीराज रॉय यांचा समावेश होता. त्यांच्या भेटीदरम्यान नगराध्यक्ष सुमन बिसेन, उपाध्यक्ष ओमप्रकाश, बांधकाम सभापती आफताब उर्फ अन्नूभाई शेख, गटनेते संतोष तिवारी, नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
क्यूसीआय पथकाने शुक्रवारी (दि.२२) देवरी शहरात आगमन झाल्यानंतर प्रथम त्यांनी मनोहरभाई पटेल हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, राणी दुर्गावती चौक मार्केट परिसर, बाजार चौक, पटाची दान, केशोरी तलाव व चिचगड रोड येथील सार्वजनिक शौचालय, बस स्टॅन्ड आणि माँ धुकेश्वरी मंदीर परिसरातील शौचालयविषयक सुविधा व स्वच्छतेसंदर्भात संपूर्ण आढावा घेतला. जीपीएस पध्दतीने जीओटॉग फोटो व आपला अहवाल आॅनलाईन दिल्लीला पाठविला.
याप्रसंगी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांना या बाबतीत समितीने विचारले असता त्यांनी सांगितले की, शहर संपूर्ण हागणदारीमुक्त झाले आहे. प्रत्येक घरी शौचालय असल्याने कोणताही नागरिक उघड्यावर शौचास जात नाही. तसेच बाहेरुन येणाºया लोकांकरिता, व्यापारी वर्गाकरिता शहरात विविध ठिकाणी दहा सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृह बांधून पूर्ण झाले आहेत. तेथे पाणी व विजेची सुविधा आहे. त्यामुळे क्यूसीआय पाहणीत सकारात्मक परिणाम प्राप्त होऊन देवरी शहराला पुन्हा एक सन्मान मिळण्याची शक्यता आहे. देवरी नगरी क्यूसीआय समितीच्या पाहणीला समोर जाणारी नागपूर विभागातील नवनिर्मित नगर पंचायतमधील एकमेव पहिली नगर पंचायत आहे, ही बाब देखील विशेष महत्त्वाची आहे. या वेळी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांनी नगर पंचायतने अतिशय नियोजनपूर्वक आखणी करुन कठोर मेहनत घेतल्याने हे शक्य झाले, असे बोलून दाखविले. यात मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी सुरूवातीपासून शौचालय बांधणे व उघड्यावर बसू नये, याकरिता विशेष प्रयत्न केल्याने व नागरिकांनी या अभियानात सहकार्य दिल्याने देवरी शहर संपूर्ण हागणदारीमुक्त होऊ शकले. तसेच या कामात नगर पंचायतच्या कर्मचाºयांना सुद्धा याचे श्रेय दिले आहे.

Web Title: Survey of the Clean India Campaign by the Central Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.