दोषींना निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:40+5:302021-05-23T04:28:40+5:30

आमगाव : येथील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच पोलीस ठाण्यात आरोपी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ...

Suspend the guilty and file a homicide charge | दोषींना निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

दोषींना निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Next

आमगाव : येथील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच पोलीस ठाण्यात आरोपी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरम कोरोटे यांनी केली आहे. मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कोरोटे सकाळपासून ठाम मांडून होते. पोलीस ठाण्यात शेकडो नागरिकांनी मृताला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांविरोधात नारेबाजी केली. मृत राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आ. कोरोटे यांनी केला आहे. मृत तरुण मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कुटुंबात एकटा असल्याने कुटुंबाचा आधार हिरावला. मृताच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. कोरोटे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, संजय बहेकार, महेश उके, मुन्ना गवळी यांनी केली आहे.

Web Title: Suspend the guilty and file a homicide charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.