‘त्या’ शिक्षकाला निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:25 PM2018-12-24T21:25:10+5:302018-12-24T21:25:24+5:30
विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या सहायक शिक्षक एस.जी.टेंभुर्णीकर (५०) याला निलंबीत करा अशी मागणी पालकांनी केली आहे. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य, संस्थापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या सहायक शिक्षक एस.जी.टेंभुर्णीकर (५०) याला निलंबीत करा अशी मागणी पालकांनी केली आहे. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य, संस्थापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
दहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा सहायक शिक्षक टेंभुर्णीकर यांनी गुरुवारी (दि.२०) तालुक्यातील सोनपुरी येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून टेंभुर्णीकरला अटक केली आहे. मात्र हे घृणीत कृत्य करणाºया शिक्षक टेंभुर्णीकर याला निलंबित करण्यात यावे अशी मागणी पालकांनी केली आहे. यासाठी पालकांनी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे प्राचार्य, संस्थापक आणि गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
विशेष म्हणजे, टेंभुर्णीकरला निलंबित नाही केले तर आमच्या मुला-मुलींचे आम्ही ट्रांसफर सर्टिफिकेट मागू असा इशारा बाम्हणीचे सरपंच लक्ष्मण नागपुरे, डॉ. राजकुमार नागपुरे, बजरंगलप्रमुख बद्रीप्रसाद दसरिया, माजी सरपंच नेतराम मच्छिरके, प्रमोद देशमुख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालदास दसरिया, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भरतलाल नागपुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश मोहारे, महेश मच्छिरके, पुरुषोत्तम चंदनकर, किशोर मच्छिरके, घासी मोहारे यांच्यासह गावकºयांनी दिला आहे.