मुख्याध्यापकासह तिघे निलंबित
By admin | Published: October 10, 2016 12:25 AM2016-10-10T00:25:01+5:302016-10-10T00:25:01+5:30
तालुक्यातील ग्राम पुराडा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी सुमित मोहनलाल उईके
देवरी : तालुक्यातील ग्राम पुराडा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी सुमित मोहनलाल उईके (१०,रा.सोनेखारी,आमगाव) याच्या मृत्यू प्रकरणात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व चौकीदार या तिघांना निल्ंबित करण्यात आले. आमदार संजय पुराम यांनी घटनेची दखल घेतली असून प्रकरणाची चौकशी करून अहवाल आदिवासी आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मोहीत उईके याच्या मृत्यू प्रकरणाला घेऊन शनिवारी (दि.८) प्रकल्प कार्यालयात आदिवासी समाजाची बैठक आमदार पुराम यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. बैठकीला गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी येथील आदिवासी समाजाचे कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेत शासकीय व निम शासकीय आश्रमशाळेत वाढत असलेल्या विद्यार्थी मृत्यू घटना, त्यांच्या चौकशीत होणारी दिरंगाई, शाळा व्यवस्थापनातील त्रुट्या, शासन निधीचा गौरवापर यावर गांभीर्याने चर्चा करून यावर वेळेच्या अत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्याचे ठरले.
यावर प्रकल्प अधिकारी चौधरी यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्यो आश्वासन दिले. तसेच मोहीतच्या मृत्यू प्रकरणात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एम.व्ही.लांजेवार, अधीक्षक सि.व्ही.नवघरे व चौकीदार एम.व्ही.बारसे यांना निलंबीत केले. (तालुका प्रतिनिधी)