आरोग्य सेवकाचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:37 PM2017-12-15T23:37:40+5:302017-12-15T23:39:20+5:30
अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेवक आर.एम.रामटेके याच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवींद्र ठाकरे निलंबनाची कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेवक आर.एम.रामटेके याच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवींद्र ठाकरे निलंबनाची कारवाई केली आहे.
आरोग्य सेवक आर.एम.रामटेके याच्या विरोधात विविध तक्रारी होत्या. त्यात पूर्र्व परवानगी न घेता कामावर गैरहजर राहणे, उद्धट बोलणे, गृहभेट न करणे, मुख्यालयी वास्तव्यास न राहणे, वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाची अवहेलना करण्याचा आरोप होता.
मुकाअ ठाकरे यांनी या प्रकाराची गांभिर्याने दखल घेत महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील तरतुदीनुसार वर्तणूक नियमांचे भंग केल्याने रामटेकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळामध्ये त्याचे मुख्यालय तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा येथे निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान सदर कर्मचाºयाचे निलंबनाचे आदेश कार्यालयात पोहचताच कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पंधरा दिवसात सात कर्मचारी निलंबित
जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ठाकरे यांनी जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयांना आकस्मिक भेटी देणे सुरू केले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी गोठगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता दोन कर्मचारी गैरहजर होते, याप्रकरणी त्यांना निलंबित केले. त्यानंतर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन शिक्षक आणि एका ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता कोरंभीटोला येथील आरोग्य सेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कर्मचाºयांमध्ये चांगलीच दहशत असून गावकºयांकडून या कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.