जातवैधता प्रमाणपत्र मिळणे होणार सोईस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 09:45 PM2019-07-07T21:45:41+5:302019-07-07T21:46:27+5:30
आपल्या हक्काच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढून ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. काँॅग्रेस-राष्टवादी कॉँग्रेसच्या कार्यकाळातील ही घटना आमच्या लक्षात होती. करिता ७० वर्षापासून न्यायाकरिता लढा देणाऱ्या समाजाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एसटीचे जात प्रमाणपत्र मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपल्या हक्काच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढून ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. काँॅग्रेस-राष्टवादी कॉँग्रेसच्या कार्यकाळातील ही घटना आमच्या लक्षात होती. करिता ७० वर्षापासून न्यायाकरिता लढा देणाऱ्या समाजाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एसटीचे जात प्रमाणपत्र मिळत आहे. तसेच जात वैधता प्रमाणपत्र पण सोईस्कररीत्या मिळणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिली.
पोवार बोर्डिंगमध्ये रविवारी (दि.७) आदिवासी गोवारी जमात संघटन समितीच्यावतीने रविवारी (दि.७) पोवार बोर्डिंगमध्ये आयोजीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाज प्रबोधन मेळावा, खिल्या-मुठया देवस्थानचा जिर्णोद्धार व शहीद स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ््यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवारी समाजाचे मुख्य समन्वयक शालिक नेवारे होते. याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले, शहीद स्मारकाचे भूमिपूजक भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगर परिषद सभपती धर्मेश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष कशिश जायसवाल, नगरसेविका मैथुला बिसेन, नगरसेवक दिपक बोबडे, गोवारी समाज जिल्हा महिला अध्यक्ष मधुमती नेवारे, अॅड.मंगेश नेवारे, गोवारी समाजाचे जिल्हाध्यक्ष का.ज.गजबे, राजेश चतुर, कार्याध्यक्ष माधव चचाने, नारायण कावरे, अमृत इंगळे, युवा स्वाभिमानचे जितेश राणे, शंकर खेकरे आदी उपस्थित होते.
बिरसा मुंडा,गोवारी समाजाचे दिवंगत नेते सुधाकर गजबे यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्र माची सुरूवात करण्यात आली. पुढे बोलताना नामदार फुके यांनी, गोवारी समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळणे सुरू झाले आणि त्यातच योगायोगाने पहिल्यांदाच एका ओबीसीला आदिवासी विभागाचे मंत्रीपद सरकारने दिले आहे. यामुळे आॅक्टोंबर २०१९ पूर्वी गोवारी समाजातील जात वैधता प्रमाणपत्राचे अडथळे कायमचे दूर करणार असून यापुढेही सदैव मी गोवारी समाजाच्या पाठीशी राहणार असल्याची हमी त्यांनी दिली.
आमदार रहांगडाले यांनी, गौवंशाचे जतन करणाºया समाजातील गोवारी बांधवांवर लाठीमार करणाºया सरकारला जनतेने धडा शिकविला असल्याचे सांगितले. तसेच गेल्या ७० वर्षापासून आदिवासींचा दर्जा मिळावा करिता संघर्ष करीत असलेल्या गोवारी समाजाला आदिवासींच्या सोयी सवलती मिळणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अग्रवाल यांनी, समाजाची ८० टक्के मागणी पूर्ण झाली आहे. आता २० टक्के शिल्लक असून ती नामदार फुकेंना आदिवासी विभाग मिळाल्यामुळे पूर्ण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविकातून गोवारी समाजाचे जिल्हा मुख्य समन्वयक नेवारे यांनी, जिल्हास्थळी गोवारी समाजाकरिता समाज भवन, शहीद स्मारक व जाती प्रमाणपत्र तर मिळत आहे, मात्र जाती वैधता प्रमाणपत्र सोईस्कर रित्या मिळावे अशी मागणी केली. तसेच कारकुनी चुकीमुळे गोंड-गोवारी अशी चुकीची नोंद केंद्र शासनाच्या दरबारी झालेली आहे. त्यावर राज्य शासनाने तोडगा काढून गोवारींचा प्रश्न पूर्ण पणे सोडविण्याची ही मागणी केली. संचालन देवानंद वरठे यांनी केले. कार्यक्र मासाठी ज्ञानेश्वर राउत, मोहन नेवारे, राधेश्याम कोहळे, गेंदलाल नेवारे, प्रेमलाल शहारे, प्रमोद शहारे, डी.टी.चैधरी, सुनिल भोयर, विवेक राउत, रमेश नेवारे, शिला नेवारे, अनिल शहारे, खेमचंद राउत, चंद्रभान चैधरी, टेकचंद चैधरी, जगदिश नेवारे, रतिराम राउत, संजय राऊत, सुशिल राऊत, संजय कोहळे आदिंनी सहकार्य केले.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कार्यक्रमात नामदार डॉ. फुके, आमदार रहांगडाले, नगराध्यक्ष इंगळे व अग्रवाल यांच्या हस्ते गोवारी समाजातील गुणवंत विद्यार्थी आर्ची नेवारे, आचल कोहळे, योगेश गुजर, आरती शेंद्रे, हर्षाली नेवारे, प्रांजली भोयर यांच्या इतर गुणवंत विद्यार्थ्यांंचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.