मुंडीपार येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 08:56 PM2018-01-08T20:56:06+5:302018-01-08T20:56:22+5:30

जिल्हा परिषद स्वदेशी खेळोत्तेजक मंडळांच्यावतीने तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत १० जानेवारीपासून चार दिवस स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Swadeshi District Sports Festival at Mundipar | मुंडीपार येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा महोत्सव

मुंडीपार येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व शाळांचा सहभाग : चार दिवस होणार सांस्कृतिक कार्यक्रम

आॅनलाईन लोकमत
गोरेगाव : जिल्हा परिषद स्वदेशी खेळोत्तेजक मंडळांच्यावतीने तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत १० जानेवारीपासून चार दिवस स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे राहतील. ध्वजारोहन खा. अशोक नेते यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य ना.गो. गाणार, आमदार अनिल सोले, आ. परिणय फुके, आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, मुख्य कार्यपालन अधिकारी राजा दयानिधी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, पं.स. सभापती दिलीप चौधरी, महिला व बालकल्याण सभापती विमला नागपुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, जि.प. सदस्य ज्योती वालदे, ललीता डुमेश चौरागडे, पं.स. सदस्य केवलराम बघेले, ललीता बहेकार, उपसभापती सुरेंद्र बिसेन, पं.स. सदस्य लीना बोपचे, अल्का कोठेवार, मोरगाव-अर्जुनी पं.स. सभापती अरविंद शिवणकर, देवरीच्या सभापती देवकरी मरई, सडक- अर्जुनीच्या सभापती कविता रंगारी, सालेकसा सभापती हिरालाल फाफनवाडे, तिरोडाचे सभापती उषा किंदरले, गोंदिया पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे व सर्व पं.स. सदस्य, तालुक्यातील सरपंच उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा क्रीडा महोत्सवात जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी होणार आहे. महोत्सवात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण, क्रीडा व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी कळविले आहे.

Web Title: Swadeshi District Sports Festival at Mundipar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.