इच्छुकांची शेवटच्या दिवशी झुंबड

By admin | Published: June 16, 2015 12:47 AM2015-06-16T00:47:57+5:302015-06-16T00:47:57+5:30

जिल्हा परिषदेच्या ५३ आणि आठ पंचायत समित्यांच्या १०६ जागांवर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांनी सोमवारी...

Swarm on the last day of wanting | इच्छुकांची शेवटच्या दिवशी झुंबड

इच्छुकांची शेवटच्या दिवशी झुंबड

Next

जि.प.-पं.स. निवडणूक : नामांकनाचा आकडा रात्रीपर्यंत गुलदस्त्यात, आॅनलाईनमुळे प्रशासनाची भंबेरी
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या ५३ आणि आठ पंचायत समित्यांच्या १०६ जागांवर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांनी सोमवारी शेवटचा दिवस असल्याने नामांकन दाखल करण्यासाठी एकच झुंबड केली. आॅनलाईन नामांकन दाखल केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (प्रिंट कॉपी) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यासाठी ठिकठिकाणच्या उपविभागीय कार्यालयात आणि तहसील कार्यालयात गर्दी उसळली होती. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत किती लोकांनी नामांकन दाखल केले याचा आकडा प्रशासनाकडे उपलब्ध नव्हता.
नामांकनपत्र दाखल करण्यासाठी सोमवारी (दि.१५) शेवटची तारीख होती. रविवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी १९७, तर पंचायत समित्यांच्या गणांसाठी २६८ नामांकन दाखल झाले होते. सोमवारी त्यात किती नामांकनांची भर पडली हे रात्रीपर्यंत कळू शकले नाही. सोमवारी आॅनलाईन नामांकनात गोंदिया व सडक अर्जुनी येथे गडबडी झाल्यामुळे अंतिम आकडा काढण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत होती. यातूनच अनेकांचे नामांकन रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसात सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होईल. विशेष म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे पक्ष सर्व जागी आपले उमेदवार उभे करणार असल्यामुळे यावेळी निवडणुकीतील रंगत वाढणार असून बहुकोणिय संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच पक्षाची तिकीट न मिळाल्याने असंतुष्ट उमेदवारांकडून बंडखोरीही होणार आहे. अदलाबदलीच्या राजकारणात एकमेकांचे उमेदवार पळविणे सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

निरीक्षक देणार मतदान केंद्रांना भेटी
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१५ करिता निवड केलेले निवडणूक निरीक्षक संबंधित तालुक्यातील मतदान केंद्र व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाला भेटी देणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व उमेदवार दिनांक १६, २१, २२, ३० जून व २ जुलै रोजी त्यांच्या भेटीच्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधू शकतील.निवडणूक निरीक्षक यांचे नाव व पदनाम, त्यांच्या भेटीचे ठिकाण, भेट देण्यात येणार असलेले तालुके व भेटीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. उपायुक्त (करमणूक) मनोज सूर्यवंशी यांच्याशी नागरिकांनी भेटण्याचे ठिकाण हिमगिरी (विश्रामगृह गोंदिया) असून ते गोरेगाव व आमगाव तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देतील. उपायुक्त (पुनर्वसन) एम.ए.एच.खान यांचेशी शासकीय विश्रामगृह सा.बां. देवरी येथे भेट घेता येईल. ते सालेकसा व देवरी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देतील. सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन देसाई यांचेशी नागरिक नवेगावबांध येथील विश्रामगृह (वन्यजीव) येथे भेट घेवू शकतील. ते सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मतदान केंद्राना भेट देतील आणि सहायक आयुक्त (उद्योग) विकास जैन यांची अदानी विश्रामगृह तिरोडा येथे नागरिक भेट घेवू शकतील व ते गोंदिया व तिरोडा तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Web Title: Swarm on the last day of wanting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.