सफाई कामगार ‘ऑन ड्यूटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:00 AM2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:22+5:30

झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. विशेष म्हणजे, कोरोनाने समस्या निर्माण केली असतानाच कधी नव्हे ते या कोरोना काळात घडत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या या लढाईत आरोग्य व पोलीस विभागाला ‘सॅल्यूट’ या शिवाय अन्य काहीही प्रतिक्रीया देता येणार नाहीत.

Sweepers 'on duty' | सफाई कामगार ‘ऑन ड्यूटी’

सफाई कामगार ‘ऑन ड्यूटी’

googlenewsNext
ठळक मुद्देसुरू झाली मान्सूनपूर्व सफाई : नगरसेवक लागले कामाला, न.प.ची उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे बहुतांश नागरिक घराबाहेर निघणे टाळत असून अवघ्या देशातच हे चित्र बघावयास मिळत आहे. यात आरोग्य व पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतानाच सफाई कामगारही आपले काम तत्परतेने बजावत असल्याचे शहरात दिसून येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू असतानाच आपला परिसर स्वच्छ ठेवून त्यात हातभार लावण्यासाठी सफाई कर्मचारी आता मान्सूनपूर्व सफाईच्या कामाला लागल्याचे दिसत आहे. नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतलचे चित्र आहे. पावसाळ्यातील स्थिती लक्षात घेता ते आपापल्या प्रभागांत स्वच्छतेची कामे करवून घेताना दिसत आहे.
कोरोनाचा आज अवघ्या जगानेच धसका घेतला आहे. झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. विशेष म्हणजे, कोरोनाने समस्या निर्माण केली असतानाच कधी नव्हे ते या कोरोना काळात घडत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या या लढाईत आरोग्य व पोलीस विभागाला ‘सॅल्यूट’ या शिवाय अन्य काहीही प्रतिक्रीया देता येणार नाहीत. मात्र त्यांच्याच बरोबरीने आज समाजातील उपेक्षीत घटकातील सफाई कामगार सुद्धा ‘ऑन ड्यूटी’ आहे.
घराघरांतील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी सकाळपासूनच कामावर लागणाऱ्या सफाई कामगारांनी आता शहर स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. कोरोनाला मात देण्यासाठी वैयक्तीक स्वच्छता जेवढी महत्त्वाची आहे तेवढाच आपला परिसरही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यामुळेच नगरसेवक आता कामाला लागले असून नागरिकांनी वर्दळ नसल्याने त्यांनी मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. यासाठी सफाई कामगारांकडून नाल्यांतील गाळ उपसून स्वच्छता केली जात आहे. विशेष म्हणजे, आजची ही स्वच्छता पावसाळ््यात शहरात समस्या उद्भवू देणार नाही.

सफाई कामगारांचे होत आहे कौतुक
कोरोनाच्या या लढाईत सर्वांनाच आज आपला जिव प्रिय असल्याचे दिसत आहे. अशात मात्र जनतेच्या जीवासाठी आरोग्य व पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यांना साथ देत सफाई कामगारही आपले कर्तव्य बजावत असून सेवा देत आहेत. त्यामुळे आरोग्य व पोलीस विभागाचे कौतुक करावे तेवढेकमी असतानाच सफाई कामगारांचेही कौतुक केले जात आहे.

Web Title: Sweepers 'on duty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.