नवीन वर्षात मिळणार गुळाचा गोडवा

By admin | Published: January 1, 2016 02:58 AM2016-01-01T02:58:38+5:302016-01-01T02:58:38+5:30

भविष्यात जिल्ह्यात गुळाच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग स्थापित होत आहेत. जर सर्वकाही योग्यरित्या चालले तर सदर

The sweetness of the goat will get in the new year | नवीन वर्षात मिळणार गुळाचा गोडवा

नवीन वर्षात मिळणार गुळाचा गोडवा

Next

गोंदिया : भविष्यात जिल्ह्यात गुळाच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग स्थापित होत आहेत. जर सर्वकाही योग्यरित्या चालले तर सदर प्रोजेक्ट सन २०१६ च्या मार्च महिन्यानंतर उद्योगाचे रूप घेवू शकते आणि जिल्ह्यातील काटीनगरसारख्या लहानशा गावातील गुळाचा गोडवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरेल.
गोंदिया तालुक्याच्या काटीनगर क्षेत्रात अनेक वर्षांपासून ऊसाचे उत्पन्न घेतले जाते. वाघ-वैनगंगा नदीच्या काठावरील शेतात उत्पन्न होणारे ऊस आपल्या गोडव्यासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून शेतकरी ऊस व त्या ऊसापासून गुळाचे उत्पादन आपल्या क्षमतेनुसार करीत आहेत. त्याची विक्री जेवढ्या किमतीमध्ये होते, तेवढ्यातच समाधान मानले जाते. या व्यापाऱ्यात सदर शेतकऱ्यांचे मोठेच शोषण होते. मात्र व्यापारी गुळ विक्री करून नफा कमावतात.
दुसरीकडे हे गुळ शुद्ध असत नाही. शेतकऱ्यांच्या घरी पर्याप्त प्रमाणात जागा असत नाही. थोड्याशा जागेत आवश्यकतेनुसार गुळ तयार केले जाते. साधन सामुग्रीच्या अभावामुळे त्याच्यावर माशा बसत-उडत राहतात. त्याचा स्वादसुद्धा प्रत्येक घरी वेगवेगळा असतो. हे गुळ काटी ते गोंदिया व येथून छत्तीसगडच्या बाजारापर्यंत पोहोचते. तेथे या गुळाची चांगली डिमांड असल्याचे बोलले जाते.
या गुळाच्या उत्पन्नात जर सुधारणा करण्यात आली तर आणखी अधिक चांगला खप होवू शकेल. गुळाचे उत्त्पन्न व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते.
ही बाब लक्षात ठेवून जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने मागील दोन वर्षांपासून सतत प्रयत्न केले जात आहेत. उत्पादन व खत यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. आता यात यश मिळण्याची आशा पक्की झाली आहे.(प्रतिनिधी)

८५ कामगारांचा समूह
४ऊसापासून गुळाच्या उत्पादन प्रक्रियेशी निगडीत काटी व परिसरातील जवळपास ८५ कामगारांना एकत्र आणूण त्यांचा समूह तयार करण्यात आला. त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या उत्पादनास चांगली आवक मिळेल. शक्यतो त्यांच्याद्वारे उत्पादित गुळाची खप देश-विदेशात होऊ शकेल. कामगारांनी तयारी दाखविल्यावर त्यांना प्रशिक्षणासाठी कोल्हापूरला पाठविण्यात आले. संपूर्ण राज्यभरात गुळाच्या उत्पादनात कोल्हापूर सर्वाधिक पुढे आहे, हे सर्वविदित आहे. आता प्रशिक्षणानंतर कामगारांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे.
स्टेयरिंग कमिटीच्या रिपोर्टची वाट
४सामूहिक स्वरूपात गुड बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून ५.१४ कोटी रूपयांचा एक प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्यात आला. सदर प्रस्ताव आता मंजुरीच्या मार्गावर आहे. मुंबईत स्टेअरिंग कमिटीची एक सभा नुकतीच झाली. या कमिटीची रिपोर्ट लवकरच मिळण्याची आशा आहे. यानंतर मार्च महिन्यापर्यंत शासनाकडून रक्कम प्राप्त होईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया पूर्ण होताच गुळ उत्पादनाचे मार्ग मोकळे होती.

काटीच्या ऊस उत्पादक-गुळ कामगारांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. गोंदियाच्या गुळाचा गोडवा आता महाराष्ट्राच्या अनेक भागात पोहोचेल. शक्यतो छत्तीसगड व देशातील इतर राज्यांमध्येही मागणी असेल. आता आम्ही भविष्यात किती यशस्वी ठरतो, हे बघायचे आहे.
-जी.ओ. भारती,
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, गोंदिया.

Web Title: The sweetness of the goat will get in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.