स्वाईन फ्लू रोग प्रतिबंधक औषध वितरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 09:22 PM2017-10-11T21:22:57+5:302017-10-11T21:23:09+5:30
सध्या संपूर्ण जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोगाचा प्रसार सुरु आहे. देवरी व परिसरातील लोकांना या आजारापासून वाचविण्याकरिता लायनेस क्लब (मेन) देवरीच्या वतीने सोमवारी (दि.९) येथील आॅफताब मंगल कार्यालयात स्वाईन फ्लू रोग प्रतिबंधक होमियोपॅथिक औषध वाटप शिबिर घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : सध्या संपूर्ण जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोगाचा प्रसार सुरु आहे. देवरी व परिसरातील लोकांना या आजारापासून वाचविण्याकरिता लायनेस क्लब (मेन) देवरीच्या वतीने सोमवारी (दि.९) येथील आॅफताब मंगल कार्यालयात स्वाईन फ्लू रोग प्रतिबंधक होमियोपॅथिक औषध वाटप शिबिर घेण्यात आले.
उद्घाटन औषध वितरक डॉ. अनिल चौरागडे यांच्या हस्ते, लॉयनेस क्लबच्या अध्यक्ष पिंकी कटकवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक यादोराव पंचमवार, अकसार शेख, लॉयनेस क्लबच्या सचिव सरोज शेंद्रे, कोषाध्यक्ष सुलभा भूते, सदस्य आरती चौरागडे, वैशाली संगीडवार, शीला मारगाडे, वनिता दहीकर, संगीता पाटील, शुभांगी निनावे, अल्का दुबे, चित्रा कडू, लक्ष्मी पंचमवार, गिरी देशमुख, नाशिका पटले, दिप्ती तिवारी, शितल सोनवाने, पुष्पा नळपते, प्रीती भांडारकर, माया खोब्रागडे, पूजा चुनचुनवार, करूणा कुर्वे यांच्यासह देवरी व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
शिबिरात औषधी वितरक डॉ. अनिल चौरागडे यांच्या हस्ते १ वर्षापासून तर वृद्धांपर्यंत एकूण एक हजार शंभर लोकांनी हजेरी लावली व स्वाईन फ्लू रोग प्रतिबंधक होमियोपॅथिक औषधाचा लाभ घेतला. प्रास्ताविक अध्यक्ष पिंकी कटकवार यांनी मांडले. संचालन सुलभा भूते यांनी केले. आभार सरोज शेंद्रे यांनी मानले.