बाघ प्रकल्पाच्या कालव्यांचे सिमेंटीकरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:40 AM2018-12-29T00:40:25+5:302018-12-29T00:41:49+5:30

क्षेत्रातील सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही यंदा बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले. यामुळे कालव्यांच्या शेवटच्या टोकावरही पाणी पोहचले.

Symmetry of Tiger project canals soon | बाघ प्रकल्पाच्या कालव्यांचे सिमेंटीकरण लवकरच

बाघ प्रकल्पाच्या कालव्यांचे सिमेंटीकरण लवकरच

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दासगाव येथील विकासकामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : क्षेत्रातील सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही यंदा बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले. यामुळे कालव्यांच्या शेवटच्या टोकावरही पाणी पोहचले. आता लवकरच बाघ प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांचे सिमेंटीकरणाचे काम मंजूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले.
तालुक्यातील ग्राम दासगाव खुर्द येथे २५१५ योजनेंतर्गत १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. प्रास्तावीकात सरपंच कोल्हे यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने परिसरात कित्येक विकास कामे झाली आहेत. या दोन रस्त्यांसह एक सभामंडपही मंजूर झाल्याचे सांगीतले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा परिषद सदस्य विठोबा लिल्हारे, रजनी गौतम, लक्ष्मी रहांगडाले, रानू पशिने, जगतराय बिसेन, मंगल कोल्हे, माया कोल्हे, सुर्यभान चव्हाण, ममता चौरे, कविता कोल्हे, गौरीशंकर कोल्हे, गेंदलाल पटले, इमला काटेवार, सुकलाल बोपचे, कविता रहांगडाले, ममता दुधबुरे, ममता तुमडाम, योगेश निखाडे, लक्ष्मीकांत कोल्हे, दुलीचंद निखाडे, राजु चौरे, जगदिश शिंदे, संजय दुधबुरे, कुवरलाल टेंभरे, मदनलाल रहांगडाले, लोकेश राणे, राजकुमार चौधरी, संतोष कोल्हे, नंदकिशोर कोल्हे, बाबूलाल बागडे, शालीकराम रहांगडाले यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Web Title: Symmetry of Tiger project canals soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.