कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:34+5:302021-04-02T04:30:34+5:30

गोंदिया : मागील काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून एकमेकांशी समन्वय ...

Systems should work in coordination to prevent corona infection () | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे ()

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे ()

Next

गोंदिया : मागील काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत कोरोना संबंधाने निर्गमित झालेले आदेश, परिपत्रक व सूचना इत्यादींची कडक अंमलबजावणी करून दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग व बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यात तपासणी वाढविण्याचे निर्देश देऊन तालुका स्तरावर संपूर्ण आरोग्य यंत्रणेला पूर्ण कार्यक्षमतेने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जिल्हा सूचना व विज्ञान विभागामार्फत जिल्ह्याच्या सांकेतिक स्थळावरून सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनाच्या उपचारासाठी खाटांची संख्या, कंटेन्मेंट झोन, लसीकरण इत्यादी बाबतची माहिती अद्ययावत करून या सेवेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा, असे निर्देश दिले. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगर परिषद-नगर पंचायत मुख्याधिकारी उपस्थित होते.

-----------------------------

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिली जबाबदारी

उपविभागीय अधिकाऱ्यांना कोरोनाबाबत रुग्ण ज्या क्षेत्रामध्ये आढळून आल्यास त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करणे, बाधित रुग्णांच्या उपचारासाठी कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करून तेथे रुग्णांना दाखल करणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे संपर्क तपासणी करणे, कंटेन्मेंट झोन व हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये प्रत्येक ३ दिवसांत सर्व्हे करणे, सर्व्हेमध्ये ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन लेव्हलची तपासणी करणे, आयएलआय व सारी इत्यादी प्रकारच्या रुग्णांचा शोध घेणे, फिवर क्लिनिक ॲक्टिव्ह करणे, गृह अलगीकरणात असलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारणे इत्यादी संदर्भात सूचना देण्यात आल्या.

Web Title: Systems should work in coordination to prevent corona infection ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.