तांडा येथील नाथजोगी कुटुंबीयांना मिळणार घरकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:25 AM2018-12-01T00:25:47+5:302018-12-01T00:26:06+5:30
तालुक्यातील ग्राम तांडा येथील नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी राज्य शासनाने ८८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच या वसाहतीतील २० कुटूंबांना घरकुल मंजूर केले आहे.त्यामुळे अनेक वर्षांनंतर नाथजोगी वसाहतीतील नागरिकांची समस्या मार्गी लागल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाव झळकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील ग्राम तांडा येथील नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी राज्य शासनाने ८८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच या वसाहतीतील २० कुटूंबांना घरकुल मंजूर केले आहे.त्यामुळे अनेक वर्षांनंतर नाथजोगी वसाहतीतील नागरिकांची समस्या मार्गी लागल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाव झळकले.
ग्राम तांडा येथील नाथजोगी कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास करुन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. नाथजोगींच्या वसाहतीचा विकास आणि त्यांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी. आ. अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच दखल राज्य सरकारने २८ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत वसाहतीच्या विकासासाठी ८८ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून २० नाथजोगी कुटुंबांना घरकुल तयार करुन देण्यात येणार आहे. तसेच समाजभवन, पाणी पुरवठा योजना, सिमेंट रोड, विद्युत व्यवस्था आदी कामे करण्यात येणार आहे.
शासनाने पहिल्या टप्प्यात २० घरकुल बांधकामांना मंजुरी दिली असून दुसºया टप्प्यात उर्वरित कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. तांडा येथील नाथजोगी वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पायाभूत सोयी सुविधांचा अभाव होता. याचीच दखल आ.अग्रवाल यांनी त्यांच्या वसाहतीत पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत शासनाने हा निधी मंजूर केला आहे.
या वसाहतीतील कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत घरकुल, पाणी पुरवठ्याची सुविधा, वीज, पक्के रस्ते आधी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. घरकुलाचा लाभ घेण्यासाठी नाथजोगी कुटुंबांना ५ गुंठे जमिनीची व्यवस्था करावी लागणार होती. मात्र ही अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी अग्रवाल यांनी शासनाकडे केली होती.
अखेर ती अट सुध्दा रद्द करण्यात आली. यापुढेही नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी कठिबध्द राहणार असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले. नाथजोगी वसाहतीसाठी व घरकुलासाठी निधी मंजूर करुन दिल्याबद्दल आ.गोपालदास अग्रवाल यांचे संतोष तांबू, सरपंच रविंद्र पंधरे व निर्मला बहेकार, रोहीणी रहांगडाले, विठोबा लिल्हारे, रामसिंह परिहार, भास्कर रहांगडाले, उत्तम खांडेकर यांनी आभार मानले.