अर्ज न स्वीकारणाऱ्या ग्रामसेविकेवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:23+5:302021-02-23T04:45:23+5:30
खातीया : तालुक्यातील अर्जुनी येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडे घरकुलासंदर्भातील माहितीकरिता माहितीच्या अधिकारातंर्गत अर्जदाराने माहिती मागितली असता ती देण्यास ग्रामसेविकेने टाळाटाळ ...
खातीया : तालुक्यातील अर्जुनी येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडे घरकुलासंदर्भातील माहितीकरिता माहितीच्या अधिकारातंर्गत अर्जदाराने माहिती मागितली असता ती देण्यास ग्रामसेविकेने टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मीराबाई राऊत यांनी केली आहे.
ग्राम अर्जुनी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसेविकेला माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठी अर्ज मीराबाई रामचंद राऊत या अर्ज घेवून गेल्या. मात्र, ग्रामसेविकेने माहितीच्या अधिकारातंर्गत अर्ज घेण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी घरकुल योजने संदर्भातील माहिती माहितीच्या अधिकारातंर्गत मागविली होती. मात्र, ग्रामसेविकेने त्यांचा अर्ज न स्वीकारल्याने त्यांनी हे माहिती अधिकाराचे नियमाचे उल्लघंन असल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, खंडविकास अधिकारी यांच्याकडे केली असून माहिती अधिकाराचा अर्ज न स्वीकारणाऱ्या ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.