रेती माफियांवर कडक कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:54 PM2019-07-19T23:54:41+5:302019-07-19T23:55:21+5:30
तालुक्यातील रेती चोरी संबंधी वृत्त प्रकाशित केल्याने रेती माफियाने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या रेती माफियावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सालेकसा तालुका पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील रेती चोरी संबंधी वृत्त प्रकाशित केल्याने रेती माफियाने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या रेती माफियावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सालेकसा तालुका पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तालुक्यातील बोदलबोडी येथील रेती घाटावरुन अवैधरीत्या पावसाळ्यात रेतीची चोरी करुन साठवून ठेवने व ती अधिक दराने विक्री करण्याचा गोरखधंदा येथील काही रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात सुरु होता. यानंतर चोरीची रेती उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड पकडली होती. त्यानंतर पकडलेल्या रेतीचा लिलाव करण्याचे आदेश तहसीलदार पित्तुलवार यांना देण्यात आले होते.
या संदर्भातील बातमी प्रकाशीत केल्यामळे एका पत्रकाराला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी ट्रॅक्टर व्यावसायिक धीरज ब्राम्हणकर यांनी दिली. या संदर्भात पोलीस स्टेशन येथे ब्राम्हणकर यांची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यानंतरही धमकी देणाºयावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
पत्रकारांच्या संरक्षणार्थ तयार केलेल्या कायद्याचा वापर करुन संबंधीत रेतीमाफिया आरोपीवर कठोर व दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.