युरिया विक्रीत भ्रष्टाचार करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:45+5:302021-09-19T04:29:45+5:30
सडक-अर्जुनी : युरिया खताच्या विक्रीत होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी दुकानदारावर कारवाई करावी यासह अन्य विषयांवर तालुका शेतकरी सल्लागार समितीची सभा ...
सडक-अर्जुनी : युरिया खताच्या विक्रीत होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी दुकानदारावर कारवाई करावी यासह अन्य विषयांवर तालुका शेतकरी सल्लागार समितीची सभा शुक्रवारी (दि. १७) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पार पडली.
एफ. आर. टी. शहा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेला तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे, पुष्पमाला बडोले, प्रभू डोंगरवार, शिवाजी गहाने, सुधीर कोरे, प्रवीण कापगते, शीतल मारवाडे, संगीता मडावी, रूपचंद पुस्तोडे उपस्थित होते. सभेत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना, खरीप धान पिकावर फवारणी कशी करावी व रब्बी हरभरा पेरणी यंत्राने पेरणी करण्याबाबत प्रशिक्षण घेणे, रोहयो फळबाग लागवड योजना अंतर्गत १०० टक्के अनुदानावर पपई, केळी, सफरचंद, बोर लागवडीची तरतूद करण्यात यावी, याबाबत पाठपुरावा करणे, अहिल्याबाई होळकर नर्सरी तयार करणे योजनेतून ५० टक्के अनुदानावर भाजीपाला नर्सरी तयार करणे, गोपीनाथ मुंढे अपघात योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची मंजुरी होण्याकरिता वरिष्ठ कार्यालयास लेखी पाठपुरावा करणे, रिक्त असलेल्या ५ कृषी सहायकांची पदे भरण्यास मागणीचा वरिष्ठांना प्रस्ताव सादर करणे, धान पिकावर गाद माशीचा प्रादुर्भाव खूप वाढल्याने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करणे याबाबत कार्यवाही करणे, आदी विषयांवर चर्चा झाली. संचालन राखी कहालकर यांनी केले. आभार म्हस्के यांनी मानले.