नूतन विद्यालयाच्या संचालक मंडळावर कारवाई करा
By admin | Published: October 5, 2015 02:05 AM2015-10-05T02:05:33+5:302015-10-05T02:05:33+5:30
नूतन महाराष्ट्र विद्या विकास मंडळ या संस्थेचे सचिव रविंद्र भालेराव यांनी शाळेमध्ये शिक्षकाची नौकरी लावून देतो म्हणून २७ लोकांकडून १.२० कोटी रूपये गोळा केले. ...
पत्रपरिषद : अन्यथा मालमत्ता गोठवा
भंडारा : नूतन महाराष्ट्र विद्या विकास मंडळ या संस्थेचे सचिव रविंद्र भालेराव यांनी शाळेमध्ये शिक्षकाची नौकरी लावून देतो म्हणून २७ लोकांकडून १.२० कोटी रूपये गोळा केले. काहिंना शाळा सुधार निधीसाठी पैसे द्यावे लागतात असे सांगितले. या संपूर्ण प्रकरणात संस्थेचे पदाधिकारी लिप्त असून विद्यालयाच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी पिडितांनी आज दुपारी २.३० वाजता विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर संस्थेचे अध्यक्ष मुकुंद वझलवार व संचालकद राधेश्याम लाहोटी यांनी रविंद्र भालेराव यांचा संस्थेशी काही सबंध नाही, असे सांगितले. प्रत्यक्षरीत्या संस्था व शाळेच्या नावावर सचिवाने सन २००९ पासून केलेल्या कार्याची व संबंधित पीडितांनी याची माहिती दोघांना वेळीच दिली होती. आता, सचिवाचा संस्थेशी काहीच सबंध नाही असे म्हणने सपेशल चुकीचे आहे. रवीन्द्र भालेराव हे संस्थेचे सचिव असल्यामुळे त्यांनी सदर रक्कम स्वीकारली. याची कल्पना वझलवार यांना होती. तसेच २०१० मध्ये काही पिडितांच्या पाल्यांबरोबर जानेवारी २०१० मध्ये घेतलेल्या उमेदवारांपैकी केवळ एन.आर. डोकरीमारे,, एस.ए. नागपुरे, ओ.पी. खंडाईत, ए.पी. सुरदुसे यानांच नियुक्ती आदेश देण्यात आले. डोकरीमारे, नागपुरे यांची नेमणूक केवळ अध्यक्षांच्या मर्जीनुसार झाली असल्याचेही पीडितांनी निवेदनात नूाुद केले आहे. तसेच याचीसुद्धा चौकशी संस्थेने केली काय, असा सवालही उपस्थित केला आहे.
संचालक मंडळाने दिशाभूल न करता सर्व पीडितांचे पैसे परत करावेत अन्यथा शासनाने संस्थेची, शाळेची मालमत्ता व संस्थेच्या संचालक मंडळाची मालमत्ता ताब्यात घेऊन पैसे परत करावे, तसेच अन्य सदस्यांविरूद्ध गुन्हा दाखल अटक करावी, अशी मागणी केली आहे. पत्रपरिषदेला रा.न. श्रावणकर, पुंडलिक मानकर, रामचंद्र लांडगे, कल्पना गिऱ्हेपुंजे, झितेश वैरागडे, दिलीप कुळकर्णी, सुभाष बडवाईक, यशवंत पंचबुद्धे, एकनाथ हटवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)