शेंड्याच्या आश्रमशाळा प्रशासनावर कारवाई करा

By Admin | Published: October 25, 2015 01:50 AM2015-10-25T01:50:28+5:302015-10-25T01:50:28+5:30

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या शेंडा येथील शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

Take action on Shendi Ashramshala administration | शेंड्याच्या आश्रमशाळा प्रशासनावर कारवाई करा

शेंड्याच्या आश्रमशाळा प्रशासनावर कारवाई करा

googlenewsNext


शेंडा-कोयलारी : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या शेंडा येथील शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या प्रकरणातील हलगर्जीपणा करणाऱ्या आश्रमशाळा प्रशासकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी व आदिवासी संघटनेने दिलेल्या निवेदनातून केली आहे.
१८ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना जेवनातून विषबाधा झाली. अळ्या झालेल्या जून्या पेठातून पोळा तयार करण्यात आल्या होत्या. त्या पोळ्या खाल्यामुळे विद्यार्थ्यांना मळमळ होऊन विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यावेळी उपसरपंच छत्रपाल परतेकी शाळेत गेले. त्यांनी घटनेची माहिती अधीक्षक के.टी. शंभरकर यांना भ्रमणध्वनीवरून दिली. परंतु त्यांनी या प्रकरणाची दखल न घेता मी देवरीला आहे तुम्ही विद्यार्थ्यांना बघून द्या असे बेजवाबदारीचे उत्तर दिले. त्यामुळे पालकांमध्ये रोष वाढला. १६ विद्यार्थ्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
१९ आॅक्टोबरला आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन्न व औषध विभागाचे अधिकारी चौकशीला आले. आ.संजय पुराम यांनी भेंट दिली. या भेटीत त्यांनी भेटीपुस्तकेत दोषींना निलंबित करण्याचे नोंदविले. शाळा व्यवस्थापन समिति व पालक समितीच्या सदस्यांनी शाळेत जाऊन पाहिले असता आश्रमशाळेत अनेक असुविधा होत्या. स्वयंपाक गृहकाचे नालीत सीळे अन्न फेकले होते.
गोदामातील अन्नामध्ये अळ्या होत्या. शौचालयाची दुर्गंधी येत होती. वस्तीगृहातील विद्युत उपकरणे लोंबकळत होते. त्यामुळे विद्युतचा शॉक विद्यार्थ्यांना कधी ही बसू शकतो हे नाकारता येत नाही. पिण्याच्या पाण्याची टाकी अस्वच्छ होती. विद्यार्थ्यांना गरम कपडे पुरविले गेले नाही. विद्यार्थ्यांना गणवेश नाही. इंग्रजी विषयाचे फक्त दोनच तास घेतले असल्याची माहिती पुढे आली आहे.
अधीक्षक व मुख्याध्यापक सायंकाळी ६ ते ९ च्या सुमारास शाळेत हजर राहत असल्याची ओरड सुरू होती. शेंडा ते देवरी प्रकल्प कार्यालय हे अंतर २० किमी. आहे. अनेक महिने प्रकल्प अधिकारी या शाळेला भेट देत नसल्यामुळे या शाळेत मनमर्जी कारभार सुरू आहे. मुख्याध्यापक व अधीक्षकांना निलंबित करावी असी मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Take action on Shendi Ashramshala administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.