आयुष उपचार पद्धतीचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:34 PM2019-02-23T23:34:35+5:302019-02-23T23:35:30+5:30
विदर्भ सिंधी महिला समिती व आयुष विभाग बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत बुधवारी स्थानिक सख्खर सिंधी भवनात आयुष शिबिर आयोजित करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विदर्भ सिंधी महिला समिती व आयुष विभाग बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत बुधवारी स्थानिक सख्खर सिंधी भवनात आयुष शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन संत श्री झुलेलाल व आयुर्वेद देवता धन्वंतरी यांच्या छायाचित्राचे पूजन व दीप प्रज्वलन करुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख मार्गदर्शक बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, विदर्भ सिंधी परिषदेचे डॉ. हरिष बजाज, आयुष विभागाच्या डॉ. गायत्री धाबेकर, डॉ.अर्चना चव्हाण, योगा मार्गदर्शक ममता बैस, पंचकर्म तंत्रज्ञ शबाना, पंचकर्म आयुर्वेद स्पेशालिस्ट डॉ. सोनवाने उपस्थित होते. या वेळी श्याम निमगडे यांनी आधुनिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या सर्व व्याधीवर आयुष उपचार पद्धती रामबाण आहे. राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत मोफत चिकित्सा व उच्च दर्जाची औषधी मोफत दिली जाते त्याचा लाभ घ्यावा. आयुष शिबिराच्या मार्गदर्शक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी जुनाट व्याधीवर सांधेदुखी, मधुमेह, अस्थमा आदिवर आयुर्वेदाचे उपचार चांगले प्रतिसाद देतात. बाई गंगाबाई महिला रुग्णालयात मोफत चिकित्सा तज्ज्ञ उपलब्ध आहेत. याचा गोंदिया शहरातील महिलांनी लाभ घ्यावा असे सांगितले. पंचकर्म विशेष तज्ञ डॉ. सोनवणे यांनी या कॅम्पमध्ये स्पेशल पंचकर्म चिकित्सेद्वारे ८५ प्रौढ महिलांचे विविध जुनाट व्याधीवर शास्त्रक्त पद्धतीने उपचार केले. या वेळी सख्खर शीख पंचायत सभागृहात आयुर्वेद, होमयोपॅथी, युनानी औषधोपचार व योगाभ्यास यावर उपयुक्त अशी आरोग्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.त्याद्वारे योगा मार्गदर्शीका ममता बैस यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अर्चना चव्हाण यांनी महिलांच्या वंधत्व व मासिक धर्माच्या समस्यांवर होमिओ उपचार लाभकारक असल्याचे सांगितले. तसेच होमिओपॅथीबद्दल उपयुक्त माहिती दिली. या शिबिराचा १३८ रुग्णांनी लाभ घेतला.