महात्मा जोतीबा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घ्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:00+5:302021-07-22T04:19:00+5:30
महात्मा जोतीबा फुले जीवनदायी योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी त्यांनी, या योजनेकरीता नोंदणी करताना नागरिकांनी ...
महात्मा जोतीबा फुले जीवनदायी योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी
त्यांनी, या योजनेकरीता नोंदणी करताना नागरिकांनी आपल्या सोबत स्वतःचे ओरीजिनल रेशन कार्ड व ओरीजिनल आधार कार्ड किंवा कोणतेही शासन अधिकृत परिचय प्रमाणपत्र, कार्ड घेऊन जावे ( कागदपत्रांची झेरॉक्स प्रत स्विकारली जात नाही)
व कागदपत्रे जिल्ह्यातील अधिकृत दवाखान्यातील आरोग्य मित्रांकडे जमा करून घ्यावीत. या योजनेंतर्गत नोंदणी करून कार्ड बनवून घ्यावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगीतले. यासाठी जिल्ह्यात कुँवर तिलकसिंग हाॅस्पिटल, बाई गंगाबाई हाॅस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, देवरी येथील ग्रामीण रुग्णालय, सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालय, अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी दवाखान्यांत येथील बहेकार हाॅस्पिटल, ब्राम्हणकर हाॅस्पिटल, राधेकृष्ण हाॅस्पिटल, बालाजी हाॅस्पिटल, न्यू गोंदिया हाॅस्पिटल, रिलायन्स कँन्सर हाॅस्पिटल हे नोंदणीकृत असून या योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे डॉ. मोहबे व डॉ. हुबेकर व डॉ. जयंती पटले यांनी कळविले आहे.