विशेष मतदार नोंदणीचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:31 AM2019-03-03T00:31:14+5:302019-03-03T00:33:30+5:30
मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नोंदणी करता यावी यासाठी शनिवारी (दि.२) व रविवारी (दि.३) विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा नागरिकांना आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नोंदणी करता यावी यासाठी शनिवारी (दि.२) व रविवारी (दि.३) विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा नागरिकांना आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील १२८१ मतदान केंद्रावर कार्यक्र म राबविण्यात येणार आहे. या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
मतदार नोंदणी संदर्भातील विशेष कार्यक्र मांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१) आयोजीत सर्व राजकीय पक्ष व निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत माहिती देताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी, दिव्यांग मतदारांना या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी विविध संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा बैठकीत उपस्थित होते.
बैठकीत यापूर्वी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहिमेंतर्गत पात्र मतदारांसाठी मोहिम राबविण्यात आली होती.
या मोहिमेंतर्गत ५ हजार ५५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर मोहिमेंतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ अर्ज ३८५५, मतदार यादीतील नावात आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज ५५८, मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना ८ अर्ज १०३४ तथा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना ८ अ अर्ज १११ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत प्रसिद्ध अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांना विशेष मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जावून आपले नाव मतदार यादीत नोंदविता येईल. ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे त्यांनीही आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करु न घ्यावी. मतदारांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याबाबत खात्री करणे गरजेचे असल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
जरी ओळखपत्र मतदारांकडे असले तरी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे. तेव्हाच मतदानाचा अधिकार मतदाराला प्राप्त होणार आहे. मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे शिबिरामध्ये उपलब्ध राहणार असून मतदार यादीत नाव नसल्यास या मोहिम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे असेही त्यांनी सांगीतले.