कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 08:58 PM2018-07-26T20:58:17+5:302018-07-26T20:59:08+5:30

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे.

Take advantage of welfare schemes | कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत नोंदणी अभियान सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील या क्षेत्राशी संबंधित कामगारांनी आपली नोंदणी या विशेष अभियानात करून घ्यावी. नोंदणीकृत कामगारांनी या योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव व कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० ठिकाणी २३ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरूवात सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपयार्ड नवेगावबांध येथे करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य रचना गहाणे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य होमराज कोरेटी, विजया कापगते, केवलराम पुस्तोडे, अण्णा डोंगरवार, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, विजय अरोरा, उमाकांत ढेंगे, मसराम, हरिशचंद्र उईके, तहसीलदार धनंजय देशमुख, प्रभारी उपविभागीय अधिकारी कोरूडे, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक समीर बन्सोड, कृउबासचे सभापती कासिम जमा कुरेशी उपस्थित होते.
या वेळी कृउबासचे सभापती कुरेशी हे हज यात्रेला जाणार आहेत, त्याबद्दल पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी अनूपकुमार भावे यांनी केले. आभार अशोक परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमात कामगार व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
पॉलिथीनबंदीचा अधिकाऱ्यांना विसर
पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात पॉलिथीनचा सर्रास वापर करण्यात आला. राज्यात पॉलिथीनबंदी झाली आहे. याचा जणू विसरच अधिकाऱ्यांना पडला होता. पॉलिथीनचे वेस्टन लावलेल्या पुष्पगुच्छांचा वापर स्वागत करताना करण्यात आला, अशी कुजबूज उपस्थितांमध्ये होती.

Web Title: Take advantage of welfare schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.