तब्बेत सांभाळा, पाऊस थांबला, उन्हाचा चटका देखील वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:47+5:302021-08-25T04:34:47+5:30
.............. आकडेवारी काय सांगते महिना अपेक्षित पाऊस ...
..............
आकडेवारी काय सांगते
महिना अपेक्षित पाऊस झालेला पाऊस किमान तापमान कमाल तापमान
जून १९२.८ मिमी २०९.८ मिमी ३२ अंश से. २४ अंश से.
जुलै ४१४.९ मिमी ३६४ मिमी २६ अंश से. २३ अंश से.
ऑगस्ट ४१३.९ मिमी १७९.५ मिमी ३२ अंश से. २४ अंश से.
.............................................
कुठे किती पाणीसाठा
प्रकल्प संख्या पाणीसाठा
लघु २० ३०.५२ टक्के
मध्यम ०९ २८.६९ टक्के
मोठे प्रकल्प ०५ ३५.४५ टक्के
..........................................
जुलैमध्ये सर्वांत कमी पाऊस
- यंदा जुलैमध्ये सरासरीच्या तुलनेत १०० मि.मी. पाऊस कमी पडला तर ऑगस्टमध्येसुद्धा पावसाची सरासरी कमीच आहे. पावसाची तूट वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
- जिल्ह्यात १ जून ते २४ ऑगस्टदरम्यान ९२८.१ मिमी पडतो, त्या तुलनेत या कालावधीत प्रत्यक्षात ७५३.३ मिमी पाऊस झाला असून ८१.२ टक्के पाऊस झाला आहे.
- मान्सून कालावधीत जिल्ह्यात एकूण १२२०.३ मिमी पाऊस पडतो, त्या तुलनेत ७५३.३ टक्के पाऊस झाला असून ६१.७ टक्केच पाऊस झाला आहे.
- ऑगस्टनंतर पाऊस कमी होतो मात्र यंदा याच महिन्यात कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
..................
वातावरण बदलले काळजी घ्या
- यंदा वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
- बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे.
- त्यामुळे घरातील माेठ्यांना सर्दी, खोकला, ताप असल्यास त्यांनी लहान बालकांच्या संपर्कात येऊ नये
- सर्दी, खोकला, ताप असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा