भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:29+5:30
खा.अशोक नेते यांनी कचारगड यात्रे दरम्यान भाविकांना कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच जिल्हा प्रशासनाने यासाठी नेमकी काय तयारी केली आहे.याचा आढावा घेतला.यात्रेदरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रास्थळी काम सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : समस्त आदिवासी बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील कचारगड येथील यात्रेला ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या यात्रेकरिता देशभरातील लाखो भाविक येथे दरवर्षी येतात.यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेऊन सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्या असे निर्देश खा.अशोक नेते यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
कचारगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर सालेकसा येथील तहसील कार्यालयात गुरूवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. खा.अशोक नेते यांनी कचारगड यात्रे दरम्यान भाविकांना कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच जिल्हा प्रशासनाने यासाठी नेमकी काय तयारी केली आहे.याचा आढावा घेतला.यात्रेदरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रास्थळी काम सुरू केले आहे. पाणी पुरवठा, ग्रामीण रुग्णालयातर्फे रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ३० रुग्णवाहिका आकस्मिक सेवेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. स्थानिक पंचायत समिती, वन विभाग आणि तहसील कार्यालयातर्फे सुध्दा विविध उपाय योजना करण्यात येत असल्याचे सांगितले.
या वेळी यात्रेला केंद्रीय मंत्री फगणसिंह कुलस्ती हे येणार असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुध्दा आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश खा.नेते यांनी दिले.
बैठकीला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा
सालेकसा येथील तहसील कार्यालयात गुरूवारी कचारगड यात्रेच्या पूर्व तयारी संदर्भात खा.नेते यांनी आढावा बैठक बोलविली होती. मात्र या बैठकीला विविध विभागाच्या २९ अधिकाऱ्यांनी दांडी मारली.त्यामुळे खा.नेते यावर चांगले संतापले. गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाºयांना दिले. नोटीसचे उत्तर आल्यानंतर सात दिवसात कारवाई करुन अहवाल सादर करण्यास सांगितले.